
“जो अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे तो पूर्णपणे खोटा आहे. माझं कोणतही अपहरण झालेलं नाही. याचा जबाब देण्यासाठी मी स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आलो आहे” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदे यांनी सांगितलं. ” माझं अपहरण झालं नसल्याबाबत 19 आणि 20 मार्चच्या दरम्यान मी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात लेखी दिलं आहे. याबाबत अपहरण झालं नसल्याबाबत माझी व्हिडिओ क्लिप देखील तयार करून पोलीस अधीक्षकांना दिली होती” असं बापू शिंदे म्हणाले. “खोटे गुन्हे दाखल करून आमचे जे राष्ट्रवादीचे सदस्य आहेत त्यांना मतदानापासून वंचित ठेवणे हा विरोधकांचा उद्देश होता” असं ते म्हणाले.
“ही चुकीची निवडणूक झाली आहे. एखाद्याला तुरुंगवास असला तरी त्याला मतदान करण्याचा अधिकार आहे. तरी देखील हॉलमध्ये पाऊल टाकण्यास आणि पोलिसांनी 2 सदस्यांचे अपहरण केले. याबाबत आम्ही सर्व सदस्य मिळून गुन्हा दाखल करणार. मला सुद्धा मतदानापासून वंचित ठेवण्याचं पोलिसांचे षडयंत्र होतं” असं बापू शिंदे म्हणाले.
ही खोटी केस दाखल झाली आहे
“मी सविस्तर माझ्या तक्रारीत माझं अपहरण झालं नव्हतं असं सांगितलं आहे.पोलिसांनी माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही. विशिष्ट पक्षाची जिल्हा परिषद राहिली पाहिजे. ही खोटी केस दाखल झाली आहे. हे पोलिसांनी जाणीवपूर्वक अपहरण सदस्यांच केलं आहे” असं बापू शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री संतापले
महाराष्ट्राच्या राजकारणात सातारा जिल्हा परिषदेचा विषय गाजतोय. या घटनेचे आज विधान भवनातही पडसाद उमटले. सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रकरणात मंत्री शुभंराज देसाई यांना मारहाण झाली आहे. एका मंत्र्यासोबत असं घडल्याने आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विधानभवनाच्या पाऱ्यावर आंदोलन केलं. पायऱ्यांवरील आंदोलनावरुन मुख्यमंत्री संतापल्याची चर्चा आहे.
आरोपीला फरफटत नेतात, तसं मला नेलं
“उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितली आहे, या प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल. त्यानुसार कार्यवाही केली जाईल” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. “100 पोलिसांनी मला अडवलं.दंडाला चार ते पाच पोलीस आरोपीला फरफटत नेतात, तसे मला व सदस्याला फरफटत नेले” असा दावा शंभूराजे देसाई यांनी केला.