दिवस बदलतं असतात, अजित पवार म्हणाले, कधी आम्ही तिथं बसू…

| Updated on: Oct 02, 2022 | 8:01 PM

आम्ही कधीही सत्तेचा माज केला नाही. विरोधकांना कधी त्रास दिला नाही.

दिवस बदलतं असतात, अजित पवार म्हणाले, कधी आम्ही तिथं बसू...
अजित पवार म्हणाले,
Image Credit source: t v 9
Follow us on

संतोष नलावडे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, सातारा : निष्ठा नावाचा प्रकारचं राहिला नाही. कुणी पहिल्यांदा अपक्ष निवडून येतं. मग काँग्रेसची कास धरतं. नंतर त्यांना सोडून येतं. नंतर भाजपात येतं. मग त्यांना सोडून जातं. मित्रांनो, उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे जास्त पाहायला मिळतात. पण, यातून आपल्याला विकास करता येत नाही. असं सातारा येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

जाणीवपूर्वक त्रास देऊ नका

आमच्याकडं सत्ता होती. केंद्रात पवार साहेब होते. आम्ही राज्यात होतो. पण, आम्ही कधीही सत्तेचा माज केला नाही. विरोधकांना कधी त्रास दिला नाही. अधिकाऱ्यांनो, कर्मचाऱ्यांनो कुणाच्याही दबावाला बळी पडून काम करू नका. दिवस बदलतं असतात.

कधी तिथं आम्ही परत येऊन बसून कळणार पण नाही. जाणीवपूर्वक कुणाला त्रास दिला, तर… चुकलं तर जरुर अॅक्शन घ्या. कायदा, नियम सर्वांना सारखा. पण, काहीही चूक नसताना निव्वड सत्तेवर असताना कुणी सांगतो. म्हणून त्रास देण्याचा प्रयत्न हा या राज्याला शोभणारा नसल्याचं अजित पवार म्हणाले.

त्यांचे दिवस असल्यानं ते बोलणारचं

महाविकास आघाडीवर दसरा मेळाव्याबाबत केलेल्या आशिष शेलार यांनी टीकेवरुन त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. एकेकाळी त्यांच्या दोन खासदार निवडून आले होते. नरेंद्र मोंदीच्या नेतृत्वामुळे ते 2014 आणि 2019 मध्ये निवडून आलेत. त्यांचे दिवस असल्यामुळे ते बोलणारचं, असं पवार म्हणाले.

अमोल कोल्हे यांनी अमित शहा यांचे कौतुक केले. आम्हीदेखील नितीन गडकरींचे कौतुक करत असतो. विचार जरी वेगळे असले तरी आम्ही काही एकमेकांचे दुश्मन नाही. माझं पण काही भाजपच्या मंडळींनी कौतुक केलं होतं. कौतुक केलं म्हणजे ते राष्ट्रवादीत आले नाही.

खासदार प्रतापराव जाधव यांनी शंभर खोके मातोश्रीवर जात होते. या त्यांनी केलेल्या आरोपावर अजित पवारा म्हणाले, ते जर इतके दिवस शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झालेत. त्यांना याआधी हे सर्व माहीत होतं तर आत्तापर्यंत का लपवलं. माहिती लपवणे हा देखील गुन्हा आहे, याची आठवण अजित पवार यांनी करून दिली.