कबुतराची नव्हे गरुडाची भरारी हवी, यांनी मांडली ही खदखद

नरेश म्हस्के यांनी सामनावरही टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले, सामना आता कोण वाचत आहे.

कबुतराची नव्हे गरुडाची भरारी हवी, यांनी मांडली ही खदखद
नरेश म्हस्के यांचं म्हणण काय?Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 6:45 PM

संदेश शिर्के, Tv9 मराठी, प्रतिनिधी, ठाणे : नरेश म्हस्के हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. ते बाळासाहेब ठाकरेंच्या पत्रावर म्हणाले, शिवसेनेच्या मनामध्ये बाळासाहेबांच्या बाबतचे विचार आहेत. ते या व्हिडीओ पत्राद्वारे समोर आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत. बाळासाहेबांचे विचार बीकेसीवरती दिसणार आहेत. सत्तेच्या खुर्चीसाठी हिंदुत्वाचे विचार यांनी सोडलेले आहेत. हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये आलेले आहे. बाळासाहेब नेहमीच म्हणत होते, कबुतराची भरारी नको गरुडाची भरारी पाहिजे. ही खदखद शिवसेनेने या व्हिडीओमार्फत मांडलेली आहे.

युवासेना म्हणजे काय? युवासेनेमुळे शिवसेना बदनाम झाली आहे. युवा सेनेमध्ये काहीही राहिले नाही. आम्ही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. युनिव्हर्सिटीचा उपयोग सुपार्‍या वाजवण्यासाठी केलेला आहे. त्यामुळे यांना बोलण्याचा काही अधिकार नाही. सर्व ठिकाणी लोकं येणार आहेत. मोठा उत्साह आहे. काही मंडळी आदल्या दिवशी येणार आहेत, असंही नरेश म्हस्के यांनी सांगितलं.

नरेश म्हस्के म्हणाले, चंद्रकांत खैरे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. ते ज्येष्ठ नेते होते. सत्य परिस्थिती पाहण्याची कोणातचं हिंमत राहिली नाही.गर्दी होणार आहे हे सर्वांना माहिती आहे.

चंद्रकांत खैरे यांच्याकडे सध्या काही काम नाही. चंद्रकांत खैरे यांनी त्या ठिकाणची शिवसेना सांभाळावी. त्यांच्या इकडचे सर्व लोक शिंदे गटात आलेले आहेत. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात स्पर्धा आहेत. खुश करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे खैरे काय बोलतात त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही.

नरेश म्हस्के यांनी सामनावरही टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले, सामना आता कोण वाचत आहे. जे कोण होते ते सामनावीर होते. ते दुसरीकडं सामना करत आहेत. त्यामुळे आता कोण सामना वीर असेल ते प्रसिद्धीच्या झोतासाठी येत असतील.

एकनाथ शिंदे यांनी कधीही मी दिघे साहेब आहे, असे कधीही म्हटले नाही. दिघे साहेबांची सर्व परंपरा एकनाथ शिंदे यांनी पुढे नेली आहे. धर्मवीर चित्रपटाच्या माध्यमातून जगभरात दिघे यांचे नाव पोचवले आहे, असंही नरेश म्हस्के यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.