Satara Accident | साताऱ्यात भीषण अपघात, कारची दुभाजकाला धडक, 6 जखमी; दोघांची प्रकृती चिंताजनक

| Updated on: Feb 03, 2022 | 7:52 AM

सातारा शहराजवळ शेंद्रे गावाजवळ असणाऱ्या सातबारा हॉटेल जवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात. सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. साताऱ्याकडून कराडच्या दिशेने निघालेल्या एर्टीगा कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत असणार्‍या दुभाजकाला धडकली. त्यानंतर हा अपघात घडला.

Satara Accident | साताऱ्यात भीषण अपघात, कारची दुभाजकाला धडक, 6 जखमी; दोघांची प्रकृती चिंताजनक
SATARA CAR ACCIDENT
Follow us on

सातारा : सातारा (Satara) शहराजवळ शेंद्रे गावाजवळ असणाऱ्या सातबारा हॉटेल जवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात. सहा जण गंभीर जखमी झाले आहेत यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. साताऱ्याकडून कराडच्या दिशेने निघालेल्या एर्टीगा कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत असणार्‍या दुभाजकाला धडकली. त्यानंतर हा अपघात (Accident) घडला. काही दिवसांपूर्वी वर्धा (Wardha Student Accident) येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात सात विद्यार्थ्यांचा अपघात झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता सातारा जिल्ह्यात हा आणखी एक भीषण अपघात घडलाय. तब्बल सहा जण जखमी असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार सातारा शहराजवळ शेंद्रे गावाच्या परिसरात सातबारा हॉटेल आहे. या हॉटेलच्या परिसरात हा अपघात घडला. एर्टीगा कारमधून काही प्रवसी साताऱ्याहून कराडकडे जात होते. यावेळी भरधाव वेगता असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यानंतर एर्टीगा कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघताचाी तीव्रता जास्त असल्यामुळे कारमधील सहा जण जखमी झाले. तसेच दोघांची प्रकृती गंभीर आहे. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच हे सर्व प्रवासी सातारा शहरातील कामाटीपुरा परिसरातील आहेत. या घटनेची माहिती होताच छत्रपती शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सची टीम तत्काळ अपघातस्थळी दाखल झाली. त्यांनी जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

साताऱ्यात अशा प्रकारे अपघात झाला

इतर बातम्या :

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्यावर आज अंत्यसंस्कार, अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी ठेवलं जाणार पार्थिव

Ramesh Deo Death : अभिनेते रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव यांची प्रेमकहाणी कशी बहरली?

संतोष परब हल्ला ते नितेश राणेंची पोलीस कोठडी; महिनाभरात सिंधुदुर्गच्या राजकारणात नेमकं काय काय घडलं? जाणून घ्या