डॉक्टर दाम्पत्याला मारहाण करत लाखो रुपये लंपास, कशी केली ही जबरी चोरी?

| Updated on: Mar 02, 2022 | 9:56 PM

कराड तालुक्यातील मसूर येथे मंगळवारी सशस्त्र दरोडा टाकण्या आला असून या दरोड्यात डॉक्टर पती पत्नीला जबर मारहाण करण्यात आली आहे. दरोड्यात रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली आहे. मसूरमध्ये सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याने कऱ्हाड तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

डॉक्टर दाम्पत्याला मारहाण करत लाखो रुपये लंपास, कशी केली ही जबरी चोरी?
Masur robbery
Image Credit source: TV9
Follow us on

कराडः कराड तालुक्यातील मसुर येथे डॉक्टर दांपत्याला जबर मारहाण करुन सशस्त्र दरोडा (Armed robbery) टाकण्यात आला. या दरोड्यात चोरट्यांनी रोख रक्कमेसह लाखो रुपयांचे दागिने (Jewelry) लंपास केल्याचेही उघडकीस आले आहे. मध्यरात्रीनंतर हा दरोडा टाकण्यात आला असताना डॉक्टर दांपत्याला जबर मारहाणही (Beating) करण्यात आली आहे. दरोडेखोऱ्यांच्या या मारहाणीत हे पती पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांना सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास उंब्रज पोलिसांकडून सुरु असून दरोडेखोऱ्यांचा शोध सुरु आहे. या शोधासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे.

कराड तालुक्यातील मसूर येथे मंगळवारी सशस्त्र दरोडा टाकण्या आला असून या दरोड्यात डॉक्टर पती पत्नीला जबर मारहाण करण्यात आली आहे. दरोड्यात रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली आहे. मसूरमध्ये सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याने कऱ्हाड तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पहाटे सशस्त्र दरोडा

पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. संपत वारे यांचा मसूर-शामगाव मार्गावर संतोषीमातानगर येथे बंगला आहे. या बंगल्यावर पहाटे सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. या दरोड्यामध्ये पती पत्नीला मारहाण करुन डॉक्टरांच्या घरातील सगळे दागिने लंपास करण्यात आले आहेत. त्यानंतर या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात केली असून त्याचा तपास सुरु आहे.

पती पत्नीला मारहाण

मसूर-शामगाव मार्गावर असलेल्या या बंगल्यात धाडसी दरोडेखोऱ्यांनी घरात प्रवेश करुन त्यांना आतील दरवाजे बंद करुन पती पत्नीला मारहाण करुन हा दरोडा टाकण्यात आला आहे. त्यामुळे दरोडेखोऱ्यांच्या हल्ल्यात दोघे जखमी झाले आहेत. या घटनेनंतर सातारा जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंसल, पोलीस उपविभागीय अधिकारी रणजित पाटील, उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी भेट देऊन श्वानपथकास पाचारण करण्यात आले.

संबंधित बातम्या

दारुच्या नशेत नातुची आजीला मारहाण, महिला कार्यकर्त्यांनी घडवली शिवसेना स्टाईलने अद्दल

Sachin Vaze : न्यायालयाच्या दणक्यानंतर सचिन वाझेची याचिका मागे, नेमकं प्रकरण काय?

Murder | बापलेकाची हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी एकाचा मृतदेह पुरला, तर दुसऱ्या मृतदेहासोबत…