Sangli Rain News : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, अलमट्टी धरणातून दीड लाख क्यूसेसक्स पाण्याच्या विसर्ग

| Updated on: Aug 10, 2022 | 12:06 PM

शिराळा तालु्क्यात मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे तालुक्यात असलेल्या चांदोली धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे.

Sangli Rain News : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, अलमट्टी धरणातून दीड लाख क्यूसेसक्स पाण्याच्या विसर्ग
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, अलमट्टी धरणातून दीड लाख क्यूसेसक्स पाण्याच्या विसर्ग
Image Credit source: tv9marathi
Follow us on

सांगली – कृष्णा नदीची (Krushna River) पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सांगलीत (Sangli) कृष्णा नदीची पाणी पातळी पोहचली 23 फुटावर पोहोचली आहे. तर अलमट्टी (Almatti) मधून दीड लाख विसर्ग क्यूसेसक्सने पाण्याचा विसर्ग सोडल्याने सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागच्या काही वर्षांपासून सांगलीकरांना पूराच्या पाण्याने वेडा घालायला सुरुवात केली. पुराचं पाणी साठण्याचं कारण म्हणजे अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सोडला नाहीतर सांगलीकर पुर्णपणे पाण्यात असतात हा मागच्या चार वर्षातला इतिहास आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील प्रमुख धरण भरल्यानंतर अलमट्टी धरणातून तात्काळ पाण्याचा विसर्ग वाढण्यात येतो. त्यामुळे कर्नाटकातील नद्यांना आता पूर येईल. एनडीआरएफची टीम देखील पाण्याची पातळीत वाढ झाल्यानंतर दाखल होते. लोकांना सुरक्षित स्थळी हटवण्यासाठी त्यांना राज्य सरकारला पाचारण करावं लागतं.

सांगलीत आयर्विन पुलाच्या जवळ कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

सांगलीत आयर्विन पुलाच्या जवळ कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. पाणी पातळी वाढल्याने नदीकाठावरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून कोयना आणि वारणा धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळी 23 फुटावर जाऊन पोहचली आहे. मात्र दुसरीकडे अलमट्टी धरणातून दीड लाख क्यूसेसक्स पाण्याच्या विसर्ग केला जात असल्याने सांगलीला दिलासा मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

वारणा नदीत 9 हजार 448 क्यूसेक्स पाणी सोडण्यात आलं आहे

शिराळा तालु्क्यात मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे तालुक्यात असलेल्या चांदोली धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे. वारणा नदीत 9 हजार 448 क्यूसेक्स पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे कोकरूड-रेठरे आणि शिराळे खुर्द-माणगाव हे बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या 24 तासात 130 मिलिमीटर पाऊस धरण क्षेत्रात आहे. वारणा धरण 85 टक्के भरले आहे. तसेच पाऊस मुसळधार पाऊस असाच राहिला तर धरणातून अजून पाणी सोडण्यात येणार आहे.