Maharashtra Rain Updates Live | कोल्हापूर, नागपूर, वाशिम आणि चंद्रपूर जिल्हातील धरणे ओव्हर फ्लो, जाणून घ्या पावसाच्या महत्वाच्या अपडेट्स

मराठवाड्यात देखील पावसाने हजेरी लावलीय. काही ठिकाणी या मुसळधार पावसामुळे शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले असून दोन ते तीन दिवसांपासून पिके पाण्यात असल्याने बळीराजा चिंतेत दिसतोयं. 

Maharashtra Rain Updates Live | कोल्हापूर, नागपूर, वाशिम आणि चंद्रपूर जिल्हातील धरणे ओव्हर फ्लो, जाणून घ्या पावसाच्या महत्वाच्या अपडेट्स
पावसाची खबरबात

| Edited By: दादासाहेब कारंडे

Aug 10, 2022 | 7:40 PM

राज्यात सध्या सर्वदूर मुसळधार पाऊस (Rain) कोसळतोयं. राज्यात मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. कोकण आणि विदर्भात 12 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा प्रशासनाकडून दिला गेलायं. तर मराठवाड्यात देखील पावसाने हजेरी लावलीय. काही ठिकाणी या मुसळधार पावसामुळे (Heavy rainशेतजमिनींचे मोठे नुकसान झाले असून दोन ते तीन दिवसांपासून पिके पाण्यात (Water) असल्याने बळीराजा चिंतेत दिसतोयं.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 10 Aug 2022 05:23 PM (IST)

  रत्नागिरी कोस्टगार्डने वाचवले 10 मच्छिमारांचे प्राण

  रत्नागिरीच्या खोल समुद्रात मच्छिमारांच्या एका जहाजाचं इंजिन बंद पडलं होतं. राजगडजवळील मुरुड जंजिरा किल्ल्याजवळ हे जहाज बंद पडलं होतं. अशावेळी रत्नागिरी कोस्ट गार्डने खलाशी आणि जहाजावरील मच्छिमारांना हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं रेस्क्यू केलं. त्यामुळे 10 मच्छिमारांचे प्राण वाचले.

 • 10 Aug 2022 05:20 PM (IST)

  पाण्यात अडकलेल्या जोडप्याला लाकडाच्या सहाय्यानं वाचवण्यात यश

  गोंदिया जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक नदी नाले तुडू्ंब भरुन वाहत आहेत. या पावसामुळे तिरोडा तालुक्यातील पांजरा इथे बुरुड समाजातील एक जोडपे अडकून पडले होते. या जोडप्याला रामेश्वर चौधरी आणि प्रदीप मडावी यांनी लाकडाच्या सहाय्यानं पाण्यातून बाहेर काढलं. त्यामुळे या जोडप्याचे प्राण वाचले.

 • 10 Aug 2022 05:17 PM (IST)

  भामा आसखेड धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार, नागरिकांना महत्वाची सूचना

  भामा आसखेड धरण जलाशयातील पाणीसाठी 100 टक्के झाल्यानं प्रकल्पाच्या चार वक्र दरवाज्यातून 620 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भामा नदीत सोडण्यात येणार आहे. अशावेळी नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये, नतीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत अशा सूचना भामा आसखेड धरण पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

 • 10 Aug 2022 04:12 PM (IST)

  भामा आसखेड धरण 100 टक्के भरले, प्रशासनाने दिला नागरिकांना सर्तकतेचा इशारा

  भामा आसखेड धरण जलाशयातील पाणीसाठा 100 टक्के झाल्याने प्रकल्पाच्या चार वकद्वारातून 620 क्यूसेक एवढा विसर्ग भामा नदीत सोडण्यात येणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले.

 • 10 Aug 2022 04:08 PM (IST)

  पुराचे पाणी घरात शिरल्याने रिसोड- मालेगाव येथील नागरिकांचे मोठे नुकसान

  वाशिमच्या रिसोड- मालेगाव या नव्याने तयार केलेल्या मार्गाच्या साईटला नाल्या न काढल्याने  वसारी येथील झोपडपट्टी परिसरात पावसाचे पाणी गेल्यानं अन्नधान्य भिजले तर अनेकांची घरी पडल्याने कुटुंबाचे संसार उघड्यावर आले. नुकसानग्रस्त झालेल्या घराचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देऊन तात्काळ रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या नाल्या करून देण्यात याव्या या मागणीसाठी आता केली जातंय.

 • 10 Aug 2022 04:06 PM (IST)

  अमळनेर तालुक्यात ढगफुटी दृश्य पावसाने शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली 

  जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात गेल्या पाच दिवसापासून अतिवृष्टी सुरू असल्याने पातोंडा सावखेडा शिवारात शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेल्याने कपासी, मूग, उडीद, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
 • 10 Aug 2022 04:03 PM (IST)

  इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

  इचलकरंजी शहराची पंचगंगा नदी सध्या 66 फुटावर वाहू लागली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलायं. शेतामध्ये पुराचे पाणी घुसले असून  राधानगरी धरणातून पाणी विसर्ग होत असल्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढू लागले तसेच श्री क्षेत्र नरसेवाडी मंदिरामध्ये कृष्णा व पंचगंगा नदीचे पाणी आले आहे तसेच अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होऊ लागला आहे.

 • 10 Aug 2022 04:00 PM (IST)

  गोरेगाव, जामगावात नागरिकांच्या घरात शिरले पावसाचे पाणी...

  अमरावतीच्या वरुड तालुक्यातील जामगाव नाल्याला पूर आलायं. गोरेगाव, जामगावात घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसा झाले आहे.  पावसामुळे शेतीच प्रचंड नुकसान झाले असून संत्रा बागांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नाल्याला पूर आल्याने गावातील अनेक घरात शिरले तर वर्षभराचे साठवलेले धान्य, कपडे ,जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्याने नागरिक चिंतेत आहेत.
 • 10 Aug 2022 03:38 PM (IST)

  भंडाऱ्यात अतिवृष्टिचा हाहा:कार, 7  तालुक्यात पावसाचा कहर

  भंडाऱ्यात पावसाने कहर केलायं. पावसाचे पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचले आहे. जिल्ह्यात 45 गांवमार्ग बंद करण्यात आले आहेत. पावसाचे पाणी अनेक लोकांच्या घरात घुसल्याने मोठे नुकसान झाले असून रस्त्यांना नद्याचे स्वरूप आले आहे. पाणी घरात शिरल्यामुळे अन्न धान्याचे सुध्दा नुकसान झाले आहे.

 • 10 Aug 2022 03:35 PM (IST)

  नदीचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान, अनेक गावांचा संपर्क तुटला

  नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातून वाहणाऱ्या वेणा नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. नदीचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालीयं. वेणा नदी देखील दुथडी भरून वाहत आहेत.  यामध्ये गुमगाव, वागधरा, जामठा, धानोली, कान्होली, कोथेवाडा, शिवमडका गावांचा समावेश आहे.

 • 10 Aug 2022 03:31 PM (IST)

  गोंदियात पाण्यात अडकलेल्या एका जोडप्याला लाकडाच्या सहाय्याने वाचवण्यात यश

  गोंदिया जिल्ह्यातील येत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले ओसडून वाहत आहे. या पावसामुळे तिरोडा तालुक्याअंतर्गत येत असलेल्या पांजरा येथील नाल्याच्या पुरात अडकलेल्या एका जोडप्याला लाकडाच्या सहाय्याने वाचवण्यात यश मिळाले आहे. जोडप्यांना पांजरा येथील रामेश्वर चौधरी व प्रदीप मडावी यांनी लाकडाचा आधार घेऊन वाचवले आहे.

 • 10 Aug 2022 03:21 PM (IST)

  अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजारमधील पूर्णा मध्यम प्रकल्पाचे 9 दरवाजे उघडले.

  अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजारमधील पूर्णा मध्यम प्रकल्पाचे 9 दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे पुर्णा नदीला मोठा पुर आलायं. पिंपरी थुगाव ते शिरजगाव कसब्याला जोडनाऱ्या पुलावरून वाहू लागल्याने संपूर्ण वाहतूक ही बंद करण्यात आलीयं. पूर्णा नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलायं.

 • 10 Aug 2022 03:17 PM (IST)

  मोहाडीत पुराच्या पाण्यात कार गेली वाहून

  भंडाऱ्याच्या मोहाडीत पुराच्या पाण्यात कार गेल्याची धक्कादायक घटना घडलीयं. वेळीच लोकांची मदत मिळाल्याने कार सहित 2 लोकांचे वाचले प्राण आहेत. नसीब बलवत्तर होते म्हणून कार मधील दोन्ही लोक बचावले आहेत. मात्र, कार पाण्यात वाहून जातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोयं.

 • 10 Aug 2022 03:15 PM (IST)

  राधानगरी धरणाचा तिसरा स्वयंचलित दरवाजा उघडला

  कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचा तिसरा स्वयंचलित दरवाजा आज उघडण्यात आलायं. दुपारी 2.30 मिनिटांनी तिसरा दरवाजा उघडला आहे. सध्या 3, 5 आणि 6 नंबरचे दरवाजे उघडले आहेत. यामुळे नद्यांना पूर येण्याची दाट शक्यता असून नदी काठच्या गावांना सर्तक राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलायं.

 • 10 Aug 2022 03:11 PM (IST)

  अतिवृष्टी ग्रस्त विदर्भाला विशेष पॅकेज द्या, खासदार भावना गावळींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

  वाशिम यवतमाळसह संपूर्ण विदर्भात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतीचं प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने विशेष पॅकेज जाहीर करावे अशी मागणी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी केली आहे.

 • 10 Aug 2022 03:09 PM (IST)

  रत्नागिरी कॉस्ट गार्डने वाचवले 10 मच्छीमारांचे प्राण

  रत्नागिरीमध्ये एक मोठी घटना घडलीयं. कॉस्ट गार्डने 10 मच्छीमारांचे प्राण वाचवले आहेत. खोल समुद्रात  बंद पडलं होतं मच्छीमारी नोकरीचे इंजिन. रायगड जवळच्या मुरुड जंजिरा किल्ल्याजवळ ही घटना घडलीयं. खलाशी आणि लवकर तांडेलना हेलिकॉप्टरक्या साह्याने केलं रेस्क्यू करण्यात आले.

 • 10 Aug 2022 01:50 PM (IST)

  मुंबईमध्ये 24 तासात 124 मिमी पावसाची नोंद

  मंगळवारी सकाळी 8.30 पर्यंत  24 तासात 124 मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये सकाळी 2.30 ते 8.30 या सहा तासात 100 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आलायं. आज मुंबईमधील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावलीयं.

 • 10 Aug 2022 01:37 PM (IST)

  आलमट्टी धरणातून विसर्ग आणखी वाढवला जाणार

  कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आहे. आलमट्टी धऱणातून विसर्ग आणखी वाढवला जाणार आहे. 2.30 वाजल्यापासून आलमट्टीचा विसर्ग 1 लाख 75 क्यूसेक्स करणार आहेत. सकाळपासून 50 हजार क्यूसेक्सने विसर्ग वाढवला आहे. आता आलमट्टीचा विसर्ग दीड लाख क्यूसेक्स इतका आहे.

 • 10 Aug 2022 01:29 PM (IST)

  कान्होली  परिसरात ओसारतोय पूर, गावांच्या रस्त्यावर पाणी असल्याने वाहतूक अद्यापही बंद 

  सततच्या पावसामुळे जिल्ह्याच्या नदी, नाले पुन्हा ओसंडुन वाहू लागली आहे. हिंगणघाट तालुक्यातील कान्होली गावाला सुद्धा मंगळवारी जोरदार पाऊस झाल्याने पुराने विळखा घातला होता. दरम्यान प्रशासनाने कालच खबरदारी म्हणून 15 कुटुंबातील 51 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले. आज सकाळपासून गावातील पाणी ओसरले असल्याची माहिती तहसीलदार सतीश मासाळ यांनी दिली. उर्वरित सर्व नागरिक सुरक्षित असून गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाणी असल्याने अद्यापही गावात जाणारी वाहतूक बंद आहे.
 • 10 Aug 2022 01:01 PM (IST)

  वांग मराठवाडी धरण 70 टक्के भरले, पाण्याचा विसर्ग सुरू

  पाटण ढेबेवाडी खोऱ्यात  जोरदार पावसामुळे वांग मराठवाडी धरण 70 टक्के भरले असून धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तब्बल 25 वर्षानंतर बांधकाम पूर्ण झालेल्या या धरणाचे चारही वक्र दरवाजे खुले ठेवण्यात आले आहेत. धरणाच्या  काठावरील  धरणग्रस्त कुटुंबांनी  निवारा शेडमध्ये आश्रय घेतला आहे.

 • 10 Aug 2022 12:50 PM (IST)

   नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयापासून 5-6 किमीवर पूर 

  नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयापासून  5-6 किमी अंतरावर 50 लोकं पुराच्या पाण्यात अडकले, काही जनावरंही अडकले. पण 12 तास लोटूनंही रेस्क्यू ॲापरेशन राबवलं नाही. अशी स्थिती आहे राज्याच्या उपराजधानीतली. आता या सर्व घटनेनंतर प्रशासनावर टिका होताना दिसते आहे.

 • 10 Aug 2022 12:37 PM (IST)

  महाराष्ट्र तेलंगणावरील पोडसा पुल पाण्याखाली, महाराष्ट्र-तेलंगणाचा संपर्क तूटला

  मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र तेलंगणावरील पोडसा पुल पाण्याखाली गेलायं. यामुळे महाराष्ट्र-तेलंगणाचा संपर्क तुटलायं. चंद्रपूर-गडचिरोली जिल्हाला जोडणारा आष्टी पुल पाण्याखाली गेल्याने मार्गावरील वाहतुक बंद झालीयं. भोयगाव - धानोरा , वरोरा - वणी मार्ग ठप्प झालायं. राजुरा - बल्लारपूर मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलीयं.

 • 10 Aug 2022 12:17 PM (IST)

  दुगारवडीमध्ये अडकलेल्या पर्यटकांचे करण्यात आले रेस्क्यू ऑपरेशन

  दुगारवाडी धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेले 22 पर्यटक मुसळधार पावसामुळे अडकून पडले होते. अचानक पाणी वाढल्यानेअडकून पडले होते. काल मध्यरात्री 22 पर्यटकांचे करण्यात आले रेस्क्यू. मुसळधार पाऊस आणि वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून जीवाची बाजी लावून पर्यटकांना करण्यात आले रेस्क्यू स्थानिक ग्रामस्थ, स्थानिक ट्रेकर्स आणि पोलिसांच्या मदतीने मध्यरात्री करण्यात आल रेस्क्यू ऑपरेशन

 • 10 Aug 2022 12:07 PM (IST)

  कोल्हापूर गगनबावडा रोडवर आले कुंभी नदीच्या पुराचे पाणी

  कोल्हापूर जिल्हात मुसळधार पावसाने हजेरी लावलीयं. यामुळे जिल्हातील सर्वच नद्यांना जवळपास पूर स्थिती निर्माण झालीयं. गगनबावडा रोडवर कुंभी नदीच्या पुराचे पाणी आल्याने मोठी तारांबळ उडालीयं. लोंघे गावाजवळच्या रस्त्यावर पाणी हे नदीचे पाणी आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावरील वाहतूक ठप्प झालीयं.

 • 10 Aug 2022 12:02 PM (IST)

  नागपूरच्या विहीरगावातील नागरिकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले

  नागपूर शेजारी विहीरगाव परिसरात पुराचं पाणी शिरलंय. यामुळे रात्रीपासून 50 पेक्षा जास्त नागरीक अडकले असून यांचं रेस्क्यू ॲापरेशन राबवणं गरजेचं आहे. याच पुराच्या पाण्यात तीन गाई अडकल्या असल्याची माहिती देखील मिळते आहे.

 • 10 Aug 2022 11:49 AM (IST)

   वाशिमच्या मोरणा नदीने धोक्याची पातळी गाठली 

  वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मोरणा नदीवरील पुलाचे दोन्ही बाजूचे सरंक्षक कठडे तुटल्याने वाहतूकीसाठी हा पुल धोकादायक ठरत आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मोरणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुलाच्या मधोमध पडलया खड्ड्यात पाणी साचले आहे. अरुंद असलेल्या या पुलावर दोन्ही बाजूने सरंक्षककडे नसल्याने रात्री बेरात्री पुलावरून वाहन जातांना मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 • 10 Aug 2022 11:26 AM (IST)

  चंद्रपूर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरूच...

  चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिली आहे. वर्धा नदीवरील वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील मोठी धरणे ओसंडून वाहत आहेत. दुसरीकडे भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरच्या गोसेखुर्द धरणातुन विसर्ग सुरू आहे. परिणामी जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत झालीये वाढ झालीयं. चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाची दारे देखील उघडली गेल्याने शहराच्या सखल भागात शिरले आहे.

 • 10 Aug 2022 11:10 AM (IST)

  आळंदीचे वारकरी आज राष्ट्रपतींना भेटणार

  आळंदीचे वारकरी आज राष्ट्रपतींना भेटणार

  राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना देणार विठ्ठलाची मुर्ती भेट

  केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे घडवून आणणार भेट

  12 वाजता राष्ट्रपती भवनात भेटणार राष्ट्रपतींना

 • 10 Aug 2022 11:04 AM (IST)

  कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

  सांगलीत आयर्विन पुलाच्या जवळ कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. पाणी पातळी वाढल्याने नदीकाठावरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून कोयना आणि वारणा धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळी 23 फुटावर जाऊन पोहचली आहे.

 • 10 Aug 2022 10:54 AM (IST)

  गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या पाण्यामुळे अनेक मार्ग बंद 

  गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या पाण्यामुळे अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. वैनगंगा व इंद्रावती नदी धोका पातळीच्या वर गेल्याने हे मार्ग बंद करण्यात आलंय. आरमोरी - गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग बंद, गडचिरोली - चामोर्शी राज्य महामार्ग  बंद, आष्टी - गोंडपिंपरी राज्य महामार्ग  बंद, छोट्या नाल्याला आलेल्या पुरामुळे खालील मार्ग बंद, गडचिरोली - माडेमूल,कूंभी, पोर्ला- नवरगाव,साखरा- चूरचूरा, चूरचूरा -नवरगाव, आलापल्ली - भामरागड लाहेरी बिनागुंडा, आरमोरी रोड ते जोगी साखरा, आरमोरी ते रामाला (वैरागड), आरमोरी रोड ते ठाणेगाव हे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.
 • 10 Aug 2022 10:28 AM (IST)

  वारणा धरणातून 9 हजार 448 क्यूसेक्स पाणी वारणा नदी सोडल,

  सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या  पाणी पातळीत वाढ होत आहे. वारणा धरण 85 टक्के भरले असून, धरणाचे चार वक्राकार दरवाजे  उचलून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. 9 हजार 448 कुसेक्स्ने पाणी वारणा नदीत सोडले जात आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कोकरूड-रेठरे, शिराळे खुर्द-माणगाव हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
 • 10 Aug 2022 10:26 AM (IST)

  गोंदिया जिल्ह्यात मुसळदार पावसाने घरात शिरले पाणी

  भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अलर्टनुसार गोंदिया जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित केला आहे.  जिल्ह्यात कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. इतकेच नाही तर रस्त्यांवरही गुडघाभर पाणी साचल्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. मुसळदार पावसाने नदी नाले ओसंडून वाहत आहे.

 • 10 Aug 2022 10:12 AM (IST)

  भोर तालुक्यातील वरंधघाट, शिरगाव परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद

  मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातल्या भोर आणि वेल्हा तालुक्यातल्या घाट माथ्यावर जोरदार पाऊस पडतोय. भोर तालुक्यातील वरंधघाट, शिरगाव परिसरात सर्वाधिक 337 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झालीय. त्यामुळे नीरा नदी, तालुक्यातले ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. हवामान खात्यानं आणखीन दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे .त्यामुळं भोर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय.

 • 10 Aug 2022 10:03 AM (IST)

  गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती कायमच

  भामरागड तालुक्यातील भामरागड तालुका मुख्यालय जवळपास 40 घरे पुराच्या पाण्यात.
  आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग मागील तीन दिवसांपासून बंद असून सध्या पाऊस थांबला असला तरी इंद्रावती नदीला पूर आला आहे.

Published On - Aug 10,2022 9:55 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें