उद्याच्या आशेनं पीक घेतलं, आणि सगळं मातीत गेलं; म्हणून या जिल्हाधिकाऱ्यांनी मदतीसाठी…

| Updated on: Mar 20, 2023 | 11:07 PM

शासनाच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना तात्काळ पिकांच्या नुकसानीचे भरपाई देण्याबाबत आवश्यक त्या सूचना जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

उद्याच्या आशेनं पीक घेतलं, आणि सगळं मातीत गेलं; म्हणून या जिल्हाधिकाऱ्यांनी मदतीसाठी...
Follow us on

सातारा : राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी आणि गारपीटाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हातातोंडाशी आलेली पिकं वाया गेल्याने शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसाठी संपावर असल्याने आता नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करणार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यातच आज शासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता शासकीय यंत्रणाही कामाला लागली असून काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या मदतीमुळे दिलासा मिळाला आहे.

सातारा जिल्ह्यात मागील 4 दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे 3 तालुक्यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये वाई, खटाव, माण तालुक्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 483.75 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये वाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात ज्वारी, गहू , कांदा, हरभरा या पिकांचे नुकसान झाले आहे.

तर या नुकसानीबाबत दोन दिवसांपासून शेती विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना तात्काळ पिकांच्या नुकसानीचे भरपाई देण्याबाबत आवश्यक त्या सूचना जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

सातारा जिल्ह्यात एकूण 483.75 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. झालेल्या या नुकसानीमुळे सातारा जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

अवकाळी पावसामुळे वाई, माण, खटाव या तालुक्यांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिकं वाया गेली आहेत.

अवकाळी पावसामुळे वाई तालुक्यातील 470.75 हेक्टर क्षेत्रातील ज्वारी, गहू, कांदा, हरभरा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

तर खटाव तालुक्यात 10.70 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून खटाव तालुक्यातील कांदा, आले, भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.

त्याच प्रमाणे माण तालुक्यातील 2.40 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून याही तालुक्यातील ज्वारी, गहू, भाजीपाला पिकांचे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत सापडला आहे.