Satara Crime: सातारा जिल्हा तिहेरी हत्याकांडाने हादरला, चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकराने प्रेयसी महिलेचा दाबला गळा, दोन लहानग्यांना ढकलले विहिरीत

| Updated on: Jun 17, 2022 | 2:43 PM

15 जून रोजी रात्रीच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून दत्ता नामदास आणि महिला यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. जेवण झाल्यानंतर दत्ता याने गळा दाबून या महिलेची हत्या केली. यानंतर दोन मुलांना वेलंग गावाजवळ असेलल्या विहिरित रात्री त्याने ढकलून दिले.

Satara Crime: सातारा जिल्हा तिहेरी हत्याकांडाने हादरला, चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकराने प्रेयसी महिलेचा दाबला गळा, दोन लहानग्यांना ढकलले विहिरीत
Satara Tripple murder
Image Credit source: TV 9 marathi
Follow us on

सातारा – चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकराने प्रेयसी महिलेचा (Lover Killed woman)गळा दाबून हत्या केली, त्यानंतर या महिलेच्या दोन लहान मुलांना गावाजळ असलेल्या विहिरीत ( 2 children in well)ढकलल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात (Satara District)उघडकीस आली आहे.कोरेगाव तालुक्यातील मौजे वेलंग या गावच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला आहे. दत्ता नारायण नामदास असं या नराधम आरोपीचं नाव असून, हा आरोपी त्याच्या मूळ गावी अकलूजला निघून गेला होता. आता या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रहमतपूर पोलीस ठाण्यात आरोपी दत्ता नामदास याच्याविरोधात तिघांच्या हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नेमका काय घडला प्रकार

ही मृत महिला आपल्या पतीपासून विभक्त होऊन प्रियकर दत्ता याच्यासोबत राहत होती. तिच्यासोबत तिची दोन मुलेही होती. 15 जून रोजी रात्रीच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून दत्ता नामदास आणि महिला यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. जेवण झाल्यानंतर दत्ता याने गळा दाबून या महिलेची हत्या केली. यानंतर दोन मुलांना वेलंग गावाजवळ असेलल्या विहिरित रात्री त्याने ढकलून दिले. ही हत्या करून आरोपीने वेलंग येथील राहत्या घराला बाहेरून कडी लावून अकलूजला पलायन केले.

हे सुद्धा वाचा

स्थानिकांच्या माहितीनंतर आरोपी अटकेत

हा सर्व प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ या प्रकरणाची माहिती रहिमतपूर पोलिसांना दिली. पोलिसांनी संशयित आरोपी दत्ता नारायण नामदासला अकलूजमधून ताब्यात घेतले आहे. तसेच वेलंग गावाजवळ मानभाऊच्या मळ्यातील विहिरीतून मुलांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या घटनेने पंचक्रोशी आणि सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चारित्र्यांच्या संशयावरुन संपूर्ण कुटुंब नाहिशे झाल्याची हळहळ जिल्ह्यात व्यक्त करण्यात येते आहे.