Karad : विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी आश्रम शाळेत ‘माझी भाकरी माझा झुणका’ उपक्रम

| Updated on: Mar 12, 2023 | 8:05 AM

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी भात बनवणे, पाचवी ते नववी च्या विद्यार्थ्यांना भाकरी बनवणे तसेच विद्यार्थींना झुणका बनवणे, अशा स्पर्धा घेण्यात आल्या.

Karad : विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी आश्रम शाळेत माझी भाकरी माझा झुणका उपक्रम
SATARA KARAD
Image Credit source: tv9marathi
Follow us on

दिनकर थोरात, कराड : विद्यार्थ्यांना (Student) स्वावलंबी बनविण्यासाठी कराड शेरे येथील सद्गुरु आश्रमशाळेने ‘माझी भाकरी माझा झुणका’ हा अभिनव उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी स्वत: शाळेच्या आवारात झुणका भाकरी बनवली. उपक्रमशील शिक्षक अश्फाक आत्तार मुख्याध्यापक मिलिंद बनसोडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम शाळेच्या आवारात घेण्यात आला. स्त्री-पुरुष समानता, स्वच्छता, नीटनेटकेपणा, स्वत:ची जाणीव, पुस्तकी ज्ञानाबरोबर स्वयंपाकाचे कौशल्य स्वयं निर्मितीचा आनंद सहकार्य ही उद्दिष्टे साध्य व्हावीत. तसेच विद्यार्थी स्वावलंबी व्हावा या उद्देशाने कराड (satara karad news) तालुक्यातील शेरे येथील सद्गुरु आश्रमशाळेने (Sadguru Ashram School) माझी भाकरी माझा झुणका हा आनंददायी आणि अभिनव उपक्रम राबवला.

स्वयंपाक करणे हे काम फक्त महिलांचेच आहे, असे म्हणणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या निमित्ताने या उपक्रमात भाग घेऊन भाकऱ्या बनवल्या. त्यामुळे आपणही स्वावलंबी व्हायला पाहिजे ही जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण झाली. तर भाकरी आम्हाला बनवायला येतच नाही. हा गैरसमज या निमित्ताने दूर झाला. तोडकीमोडकी का होईना आम्ही भाकऱ्या बनवू शकतो, याची जाणीव आम्हाला झाली. तसेच आईच्या कष्टाची किंमत ही आम्हाला समजली अशा प्रतिक्रिया यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी दिली

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी भात बनवणे, पाचवी ते नववी च्या विद्यार्थ्यांना भाकरी बनवणे तसेच विद्यार्थींना झुणका बनवणे, अशा स्पर्धा घेण्यात आल्या. भाकरीचा आकार चव व सौंदर्य हे निकष ठेवून क्रमांक काढण्यात आले. झुणक्यासाठी तसेच निकष वापरून क्रमांक घोषित करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यातील हा एक आगळावेगळा आणि अभिनव उपक्रम आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातल्या अनेक शाळेत अशा पद्धतीचे चांगले उपक्रम राबविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यातून चांगली माहिती मिळते किंवा भविष्यात व्यवसाय करण्याच्या उद्देशाने आयडिया मिळतात. कराडच्या शाळेत चांगला उपक्रम राबविल्याची सगळीकडे चर्चा आहे.