Satej Patil: गोकुळमध्ये नियम बदलण्याचे पाप कुणाचं? या दोन नेत्यांची नाव घेत सतेज पाटील यांचा थेट हल्लाबोल
Satej Patil on Gokul five directors: वोट चोरीनंतर आता सत्ता चोरी होत असल्याची घणाघाती टीका आमदार सतेज पाटील यांनी भाजपवर केली. गोकुळचा वाद गल्लीपासून दिल्लीपर्यंत पेटलेला असताना त्यांनी गोकुळमध्ये नियम बदलण्याचे पाप कुणाचं? यावरून मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी या दोन नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे.

Satej Patil on Gokul Chandrakant Patil Hasan Mushrif: कोल्हापूर सहकारी दूध उत्पादक संघाच्या, गोकुळच्या निवडणुकीनंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावरून रणधुमाळी सुरू आहे. सरकारने एक चाल खेळल्याने आता काँग्रेसविरुद्ध भाजपा असा सामना रंगला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत गोकुळ दूध संघातील राजकारणाचे पडसाद उमटत आहेत. गोकुळमध्ये महायुतीचीच सत्ता असावी यासाठी सरकारने खेळी खेळली. पाच संचालक नामनिर्देशित करण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतला आणि त्यावरून वादंग उठले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपचा तिखट समाचार घेतला. तर आताच आमदार सतेज पाटील यांनी भाजपसह महायुतीला धु धु धुतले. त्यांनी निवडणुकीनंतर संचालक आणण्याचा नियम कुणाच्या सांगण्यावरून घुसवण्यात येत आहे, याचा धडाधड पाढाचा वाचला. त्यांनी भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात चाप ओढला.
काय म्हणाले सतेज पाटील?
काल कॅबिनेटने लोकशाही आणि जनतेचे मत संपवण्याचा निर्णय घेतला. गोकुळला केंद्रबिंदू मानून निर्वाचित संचालक घुसवण्याचा कायदा करण्यात आला. उद्या कदाचित त्याचा अधिनियम निघू शकतो. हा ऑर्डिनन्स काढताना जेव्हा राज्यात सहकाराची चर्चा होते. तेव्हा हा कायदा फेडरल इन्स्टिट्यूट म्हणजे गोकुळ आणि दोन संस्थांनाच लागू होणार आहे. ऑर्डिनन्समध्ये एक वाक्य आहे. त्यानुसार, या ऑर्डिनन्समधून साखर कारखाने वगळण्यात येतील. जिल्हा बँका वगळण्यात येतील, असं स्पष्ट म्हटलं आहे. म्हणजे कोल्हापूरकरांनी आमच्याबाजूने जो कौल दिला आहे. तो नाकारण्याचे काम सरकार त्या ठिकाणी करत आहे. या कृतीचा निषेध आम्ही तर करतोच. पण कालचा कॅबिनेटचा निर्णय हा काळा दिवस असेल. एका बाजूला मतदानाचा कौल मानायचा नाही. आमचे १३ मतांचं बहुमत तांत्रिक मुद्दा करून उडवायच आहे, असा आरोप काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.
गोकुळवर साडेपाच लाख शेतकऱ्यांचा संसार
पत्रकार परिषदेत सतेज पाटील यांनी सांगितले की, गोकुळवर साडेपाच लाख शेतकऱ्यांचा संसार अवलंबून आहे. साडेपाच लाख शेतकऱ्यांना दर 10 दिवसांनी 100 कोटी रुपये त्यांच्या कष्टाला दिले जातात. रोज 20 लाख लिटर दूध गोळा होतं, अशी गोकुळची व्यवस्था आहे. अमुल नंतर सर्वात मोठा दूध उत्पादक संघ गोकुळ आहे. त्यामुळे हा दूध संघ शेतकऱ्यांचाच राहावा यासाठी हा लढा सुरू आहे. पण हे सरकार शेतकऱ्यांनी दिलेले बहुमत नाकारत आहे. राहुल गांधी यांनी आमच्या पॅनलला समर्थन दिलेले आहे. शेतकरी आज अडचणीत आहेत, असे असताना सरकार अशी भूमिका घेत असल्याचा आरोपही सतेज पाटील यांनी केला.
बातमी अपडेट होत आहे…
