“सुरेश धस हे सुद्धा आकाच…” बीडच्या खोक्या भोसलेचा आणखी एका व्हिडीओने खळबळ
बीडच्या सरपंचांच्या निर्घृण हत्येनंतर बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचे दिसून येत आहे. सतीश भोसले नावाच्या व्यक्तीचे पैसे उधळतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओमध्ये भोसले हा मोठ्या प्रमाणात पैसे उधळताना दिसत आहे.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ ला निर्घृण हत्या करण्यात आली. यामुळे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. बीडमधील शिरुर तालुक्यातील एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. भाजपचे आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांचा सतीश ऊर्फ खोक्या भोसलेने त्याला मारहाण केल्याचे समोर आले होते. शिरूर तालुक्यात खोक्याची मोठी दहशत असल्याचा आरोप होत आहे. आता या खोक्याचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सतीश भोसलेचा पैसे उधळतानाचा नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.
अंजली दमानियांकडून व्हिडीओ व्हायरल
अंजली दमानिया यांनी नुकंतच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी हटके कॅप्शन दिले आहे. “हे माननीय आदरणीय सन्माननीय सतीश भाऊ भोसले”, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. या व्हिडीओत सतीश भोसले यांच्या समोर असलेल्या टेबलावर पैशांचे बंडल पाहायला मिळत आहे. यात १००, २०० आणि ५०० रुपयांचे बंडल पाहायला दिसत आहे. सतीश भोसले हा या पैशांच्या बंडल हाताने उधळताना पाहायला मिळत आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हे माननीय आदरणीय सन्माननीय सतीश भाऊ भोसले pic.twitter.com/KYZhaqlXmD
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 7, 2025
सतीश भोसलेचे तीन व्हिडीओ व्हायरल
आतापर्यंत सतीश भोसलेचे तीन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यातील पहिल्या व्हिडीओत सतीश भोसले हा मारहाण करताना, दुसऱ्या व्हिडीओत तो गाडीत पैसे मोजताना आणि तिसऱ्या व्हिडीओत तो पैसे उधळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या व्हिडीओवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
“सुरेश धस हे सुद्धा आता आकाच निघालेले आहेत. त्यांचेही कार्यकर्ते क्रूर कृत्य करताना दिसतात. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. धनंजय मुंडेंचे वर्चस्व संपून आपलं वर्चस्व कसं वाढवता येईल, यासाठी त्यांची लढाई होती. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी व्हावी, यासाठी त्यांची अजिबात लढाई नव्हती. त्यामुळे बीडमधील जे सर्व नेते आहेत, त्यांचे जर असे कार्यकर्ते किंवा टोळ्या असतील, तर जो कोणी आका असेल, त्या सर्वांवर कारवाई होणं गरजेचे आहे”, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.
