AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

online exams | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची तांत्रिक अडचण मिटली, परीक्षेची नवी तारीख जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मंगळवारी ( 13 ऑक्टोबर) होणाऱ्या परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून मनस्ताप व्यक्त होतोय. मंगळवारी रद्द झालेल्या 5 विषयांच्या परीक्षा आता शनिवारी (17 ऑक्टोबर) होणार आहेत.

online exams | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची तांत्रिक अडचण मिटली, परीक्षेची नवी तारीख जाहीर
पु
| Updated on: Oct 14, 2020 | 11:53 AM
Share

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षांचा गोंधळ (Online Examination problem) अजूनही कायम आहे. मुंबई, औरंगाबादनंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही ऑनलाईन परीक्षांचा फज्जा उडाल्याचं दिसून आलंय. पुणे विद्यापीठातील मंगळवारी ( 13 ऑक्टोबर) होणाऱ्या परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला होता. त्यानंतर तांत्रिक अडचणी  मिटल्या असून, रद्द झालेल्या 5 विषयांच्या परीक्षा आता शनिवारी (17 ऑक्टोबर) होणार असल्याचं विद्यापीठ प्रशासनाने सांगितलं आहे. (Savitribai Phule Pune University online exams problems)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षेला 12 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा पुरता गोंधळ उडाल्याचं दिसून आलं. त्यानंतर परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंळवारीसुद्धा (13 ऑक्टोबर) परिस्थिती सारखीच राहिली. विद्यापीठाने मंगळवारी 5 विषयांच्या परीक्षेचे आयोजन केले होते. पण ऐनवेळी ओटीपी न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. त्यांना परीक्षेला बसता आले नाही. यावेळी काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे परीक्षा रद्द कराव्या लागल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. मंगळवारी (13ऑक्टोबर) रद्द केलेल्या परीक्षा आता शनिवारी (17 ऑक्टोबर) होणार आहेत.

मंगळवारी रद्द झालेल्या 5 विषयांच्या परीक्षा आता शनिवारी (17 ऑक्टोबर) होणार आहेत.

ऑफलाईन परीक्षेतही गोंधळ

पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 12 ऑक्टोबरपासून सुरु झाली. मात्र, पहिल्याच दिवशी ऑफलाईन परीक्षेचा खोळंबा झाल्याचं दिसलं. विद्यापीठाकडून ऑनलाईन पाठविल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकांची प्रिंट घेण्यासाठी आवश्यक असणारा ओटीपी न मिळाल्याने पहिल्या सत्रातील परीक्षा ठप्प झाली. सकाळी 10 चा पेपर दुपारी 12 ला सुरु झाला.

ऑनलाईन परीक्षेत काय गोंधळ ?

पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेत मोठा गोंधळ ऊडतोय. विद्यार्थ्यांना ऐनवेळी लॉगीन आयडी आणि पासवर्ड न मिळाल्याचे प्रकार समोर आले आहेत. अचानक काही अडचण आली तर, विद्यार्थ्यांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर दिले आहेत. मात्र, फोन केल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याचं विद्यार्थांकडून सांगण्यात येत आहे.

पुणे विद्यापीठाने आतापर्यंत एकूण पाच वेळा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. इंग्रजी विषयाचा पेपर विद्यार्थ्यांना मराठी माध्यमात आला. तर काही विद्यार्थ्यांना लॉगीन आयडी आणि पासवर्ड उशीराने मिळाला. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, हायड्रॉलिक्स आणि न्यूमॅटिक्स विषयांच्या परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना आकृत्या स्पष्ट दिसत नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना 10 प्रश्न सोडवता आले नाही.

दरम्यान, राज्यभरात ऑनलाईन परीक्षेचा गोंधळ उडाल्याचं दिसून आलंय. पुण्यासोबच, औरंगाबाद, मुंबई विद्यापीठातही सारखीच परिस्थिती आहे. त्यामुळे कोरोना महामारीत ऑनलाईन परीक्षेचे केलेले नियोजन पुरते बारगळल्याचे विद्यार्थी संघटनांकडून म्हटले जात आहे. तसेच पुणे विद्यापीठात परीक्षेच्या गोंधळाची चौकशी व्हावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून होत आहे.

संबंधित बातम्या  :

मुंबई विद्यापीठ ऑनलाईन परीक्षा गोंधळ, कुलगुरुंच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ

अंतिम वर्षातील परीक्षांना ग्रहण, नागपूर विद्यापीठात तांत्रिक गोंधळ, परीक्षा पुढे ढकलल्या

ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, मुंबई विद्यापीठाने आयडॉलच्या परीक्षा पुढे ढकलल्या

(Savitribai Phule Pune University online exams problems)

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.