AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking news : विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस 150 फूट खोल दरीत कोसळली, भीषण अपघात

भीषण अपघाताची घटना समोर आली आहे, विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस तब्बल 100 ते 150 फूट दरीत कोसळी, या बसमध्ये अंदाजे 20 ते 30 विद्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे.

Breaking news : विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस 150 फूट खोल दरीत कोसळली, भीषण अपघात
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2025 | 4:44 PM
Share

भीषण अपघाताची घटना समोर आली आहे, विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस तब्बल 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळी, या बसमध्ये अंदाजे 20 ते 30 विद्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा -मोलगीला जोडणाऱ्या देवगोई घाट परिसरात हा अपघात झाला आहे, बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बस दीडशे फूट खोल दरीमध्ये कोसळल्यानं पूर्णपणे डॅमेज झाली आहे. या अपघातामध्ये एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून, अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून, या अपघातामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीनं  अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्यमध्ये स्कूल बसचा भीषण अपघात झाला आहे, विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूलबस तब्बल 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली आहे. अक्कलकुवा- मोलगीला जोडणाऱ्या देवगोई घाट परिसरात हा अपघात झाला आहे. बसमध्ये दबल्याने एका विद्यार्थ्याचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, दरम्यान घटनेची माहिती मिळताच तातडीनं बचाव कार्याला सुरुवात झाली असून, अपघातामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नियंत्रण सुटल्यानं बसचा अपघात 

दरम्यान अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.  मात्र नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे. मोलगी गावाहून अक्कलकुवाच्या दिशेने विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना आमलिबारी परिसरात हा अपघात झाला आहे.

हे विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे आश्रम शाळेचे विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.  मेहुनबारे आश्रम शाळेच्या दोन बस आज दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यामुळे विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आल्या होत्या,  त्यातील एका बसचा अपघात झाला आहे.  या अपघातामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.  तर दोन ते तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...