आजी-आजोबांची आठवण आली आणि ‘ती’ लोकलमध्ये बसली, पोलिसांच्या सतर्कतेमुळे सात वर्षाच्या चिमुरडीचा शोध

| Updated on: Dec 07, 2020 | 5:44 PM

आजी-आजोबांची आठवण आली म्हणून एक सात वर्षाची मुलगी मुंब्रा रेल्वे स्टेशन येथून एकटीच लोकलमध्ये बसली (Seven-year-old girl found on police alert at kalyan station).

आजी-आजोबांची आठवण आली आणि ती लोकलमध्ये बसली, पोलिसांच्या सतर्कतेमुळे सात वर्षाच्या चिमुरडीचा शोध
Follow us on

ठाणे : आजी-आजोबांची आठवण आली म्हणून एक सात वर्षाची मुलगी मुंब्रा रेल्वे स्टेशन येथून एकटीच लोकलमध्ये बसली. पुढे ती कल्याणला उतरली. सुदैवाने मुलगी एका पोलिसाच्या हाती लागली. त्यामुळे तिला तिच्या नातेवाईकांच्या हवाली सुपूर्द करण्यात पोलिसांना यश आलं (Seven-year-old girl found on police alert at kalyan station).

रविवारी (6 डिसेंबर) रात्री नऊ वाजेच्या सुमारास कल्याण स्टेशनवर कर्तव्य बजावीत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याची नजर एका लहान मुलीवर गेली. सध्या ऑपरेशन मुस्कान सुरु असल्याने पोलीस लहान मुलांवर नजर ठेवून राहतात. ही सात वर्षांची मुलगी ट्रेनमधून उतरल्यावर पोलीस कर्मचाऱ्याने तिची विचारपूस केली. मात्र मुलगी काही एक बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. पोलीस कर्मचाऱ्याने या मुलीला थेट पोलीस ठाण्यात आणले.

कल्याण जीआरपीच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शादरूल यांनी वायरलेसद्वारे याची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला दिली. या दरम्यान मुंब्रा पोलीस ठाण्यात एक सात वर्षाची मुलगी काजल तिवारी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. या प्रकरणाची मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मधूकर कड यांनी त्वरीत दखल घेत त्यांनी सुद्धा मुलीचा शोध सुरु केला.

अखेर कल्याण स्टेशनला रेल्वे पोलिसांना सापडलेली मुलगी ही काजल तिवारीच आहे, हे उघड झालं. त्यानंतर आज सकाळी मुलीला तिच्या मोठ्या बहिणीच्या हवाली सूपूर्द करण्यात आले (Seven-year-old girl found on police alert at kalyan station).

“मुलीचे आजी-आजोबा, आई-वडील हे अंबरनाथला राहतात. बहिण ही  दिव्याला राहते. ही लहान मुलगी अंबरनाथ आणि दिवा या दरम्यान नातेवाईंकासोबत लोकलने ये-जा करते. काल रात्री तिला आजी-आजोबांची आठवण आली. ती मुंब्रा स्टेशनला लोकलमध्ये बसली. त्यानंतर कल्याण स्टेशनला गाडीतून उतरली. त्यानंतर कल्याण स्टेशनला तिला पोलिसांनी ताब्यात घेतले”, अशी प्रतिक्रिया कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शादरूल यांनी दिली. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतूक होत आहे.

हेही वाचा :

सासरच्यांनी लेकराबाळांसह घराबाहेर काढलं! 15 दिवसांचा वनवास भोगलेल्या महिलेच्या मतदीला सोमय्या धावले