AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार भाजपप्रणीत एनडीए मध्ये येऊ शकतात, राज्यातील मंत्र्याचं मोठं वक्तव्य

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत दोन राष्ट्रवादी एकत्र येणार अशी शक्यता आहे. त्यांच्यात जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील एका मंत्र्याने मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार भाजपप्रणीत एनडीएमध्ये येऊ शकतात असं त्यांनी म्हटलं आहे.

शरद पवार भाजपप्रणीत एनडीए मध्ये येऊ शकतात, राज्यातील मंत्र्याचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar
| Updated on: Dec 26, 2025 | 1:03 PM
Share

“भाजपा आणि शिवसेनेकडे इच्छुकांची गर्दी जास्त असल्याने चर्चा सुरू आहेत. कोणता प्रभाग सोडायचा आणि कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे. इच्छुक जास्त आहेत आणि जागा कमी आहेत, म्हणून कोणती जागा घ्यायची आणि लढवायची ही चर्चा होणे गरजेचे आहे. आज किंवा उद्या आमची महायुतीची घोषणा होईल” असं संजय शिरसाट म्हणाले. भाजप-शिवसेनेने छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक युतीमध्ये लढवण्याचा निर्णय घेतला आहे. “दोन-चार जागेवर जे अडलेलं आहे, त्यावर मंत्री अतुल सावे आणि मी आज चर्चा करणार आहोत आणि योग्य निर्णय घेणार आहोत” असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.

“युती बाबतची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. कोण कुठे लढणार याची यादी एक-दोन दिवसात फायनल होईल. अतुल सावे आणि मी आज फायनल चर्चा करून, ती यादी भाजपा आणि शिवसेनेच्या वरिष्ठांना पाठवू आणि नंतर जाहीर केली जाईल” असं शिरसाट म्हणाले. “शरद पवार हे जास्त काही विरोधी पक्षात राहू शकत नाहीत. त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास बघितला तर त्यांनी अनेक वेळा असे उलटे-सुलटे प्रयत्न केलेले आहेत” असं संजय शिरसाट म्हणाले.

हा निर्णय भाजपचे वरिष्ठ ठरवतील

“अजित दादा सत्तेमध्ये आहेत. त्यांच्याकडे महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे अजित दादा कोणीकडे जाणार नाहीत. परंतु शरद पवार एनडीए मध्ये येऊ शकतात.  शरद पवार यांना एनडीएमध्ये घ्यायचं का नाही? हा निर्णय भाजपचे वरिष्ठ ठरवतील. राष्ट्रवादीची भाजप बरोबर आघाडी आहे आणि आमची युती भाजप बरोबर आहे. म्हणून भाजपची शरद पवार यांच्याबद्दल काय भूमिका असेल ती भाजपने ठरवावी” असं संजय शिरसाट म्हणाले.

तर त्याला भाजप जबाबदार राहील

“शरद पवार यांना एनडीए मध्ये घ्यायचं का नाही हे एनडीएच्या नेत्यांनी ठरवायचे आहे, आम्ही पहिल्यापासून सांगत आलो आहेत भाजपची आणि आमची नैसर्गिक युती आहे. इतर घटक पक्ष एनडीएमध्ये येत असतील तर त्याला भाजप जबाबदार राहील आम्ही नाही” असं शिरसाट म्हणाले.

काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.
अजित पवारांकडून स्वबळाचा नारा! दादांची NCP 'या' महापालिकांत स्वतंत्र?
अजित पवारांकडून स्वबळाचा नारा! दादांची NCP 'या' महापालिकांत स्वतंत्र?.
ते एकटे निष्ठावंत आहे का?जगतापांच्या राजीनाम्यावर रूपाली पाटलांच भाष्य
ते एकटे निष्ठावंत आहे का?जगतापांच्या राजीनाम्यावर रूपाली पाटलांच भाष्य.
मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव आनंदाची बाब, कारण....खडसे काय बोलून गेले?
मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव आनंदाची बाब, कारण....खडसे काय बोलून गेले?.
पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेकडे वाटचाल? दादांबरोबर युती पहिली पायरी?
पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेकडे वाटचाल? दादांबरोबर युती पहिली पायरी?.
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?.
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा.
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध.
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!.
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ...
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ....