मोठी बातमी! जयंत पाटील फडणवीसांमध्ये खलबत, लगेच शरद पवार…, पडद्यामागं नेमकं काय घडतंय?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आज एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि जयंत पाटील हे सर्व नेते एकत्र आल्याचं पहायला मिळालं.

मोठी बातमी! जयंत पाटील फडणवीसांमध्ये खलबत, लगेच शरद पवार..., पडद्यामागं नेमकं काय घडतंय?
Sharad Pawar, Devendra Fadnavis
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 14, 2026 | 5:11 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. तळेगाव येथे आयोजित एका खासगी कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील एकत्र आल्याचं पहायला मिळालं. यावेळी जयंत पाटील यांनी स्वतःहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ जाऊन चर्चा केली त्यावेळी शेजारी शरद पवार हे देखील होते.  दरम्यान त्यानंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये देखील चर्चा झाल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. मात्र यावेळी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली? हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या चर्चेनंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

एकीकडे गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. परंतु काही दिवसांपूर्वीच यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून या चर्चेच खंडण करण्यता आलं आहे. मात्र तरी देखील आधून मधून ही चर्चा सुरूच असते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार ही जशी चर्चा सुरू आहे, तशीच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गट सत्तेत सहभागी होणार अशी देखील चर्चा सुरू झाली होती. मात्र ती चर्चा देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने फेटाळून लावण्यात आली होती.  यावर या भेटीदरम्यान काही चर्चा झाली का असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.

Loading...

तर दुसरीकडे राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे. खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. राज्य सरकारच्या वतीने दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, उपाय योजनांना सुरुवात झाली आहे. केंद्रीय पथकाकडून देखील महाराष्ट्रातील दुष्काळाचा आढावा घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाची आहे, या पार्श्वभूमीवर देखील काही चर्चा झाली का? असं देखील बोललं जात आहे. मात्र अजूनही चर्चेच कारणं मात्र गुलदस्त्यात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us