पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका, या बड्या नेत्याने सोडली साथ, थेट…

Pune News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना राजकीय पक्षांमध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या कामाला लागलाय. मात्र, आता पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका, या बड्या नेत्याने सोडली साथ, थेट...
Sharad Pawar Nationalist Congress Party
| Updated on: Nov 06, 2025 | 7:53 AM

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. 2 डिसेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच आता राजकीय बदल होताना दिसत आहेत. पुण्यात निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. एका मोठ्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडलीये. यामुळे पुण्यात पुढील काळात राजकीय समिकरणे पूर्णपणे बदलली असतील. पुण्याच्या खेड तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अतुल देशमुख चाकण येथे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला थेट झटका आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची साथ सोडुन तुतारी फुकणारे अतुल देशमुख आज धनुष्यबाण हाती घेणार असून अतुल देशमुख यांच्या पक्षप्रवेशाने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला खेड तालुक्यात बळ मिळणार आहे.

ऐनवेळी विधानसभेला उमेदवारी नाकारल्याने नाराजी अन स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत दुफळी असल्याने शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय अतुल देशमुख यांनी घेतल्याचं बोललं जातंय. आता अतुल देशमुख यांच्या प्रवेशाने शिंदेंच्या शिवसेनेला मोठी ताकद पुढील निवडणुकांमध्ये मिळणार हे यावरून स्पष्ट आहे. पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद मागील काही दिवसांपासून वाढताना दिसतंय.

आता निवडणुकीची जबाबदारी असणाऱ्यांना रजा बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेतील निवडणुकीच्या कामासाठी नेमलेले अधिकारी आणि कर्मचारी अचानक सुट्टीवर जात असल्याने कामामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे निवडणुकीच्या कामाची जबाबदारी असणाऱ्यांना निवडणूक शाखेची परवानगी घेतल्याशिवाय रजा टाकू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असे आदेश जारी. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ची तयारी सुरू. प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण झाली असून, सध्या प्रारूप मतदार याद्यांचे काम सुरू