Pune: तो स्वतःला संपवणार होता, पोलिसांच्या सतर्कतेने जिंकले सर्वांचे मन! नेमकं काय घडलं?
सध्या सोशल मीडियावर पुणे पोलिसांचे कौतुक होत आहे. एका ज्येष्ठ नागरिका जीव वाचवण्यासाठी त्यांनी जे काही केलं ते पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. आता नेमकं काय घडलं? जाणून घ्या...

सध्या सोशल मीडियावर पुण्यातील पोलिसांचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी पुणे पोलिसांचे कौतुक केले आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की एक वृद्ध व्यक्ती भांडणाला कंटाळून फाशी घेण्याचा प्रयत्न करत आहे. तेवढ्यात घटनास्थळी पोलिस पोहोचली. त्यांच्या सतर्कतेमुळे ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचला आहे. आता नेमकं काय झालं? प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया…
काय आहे प्रकरण?
ही घटना पुणे जिल्ह्यातील महंमदवाडीच्या कृष्णानगर भागातील आहे. बुधवारी महंमदवाडी बीट मार्शल पोलीस नाईक बुधवारे आणि पोलीस शिपाही थोरात यांना डायल ११२ वर एक कॉल आला. फोनवरुन माहितीदेण्यात आली की एका दांपत्यात साधे भांडण झाले आहे आणि ज्येष्ठ व्यक्ती स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. माहिती मिळताच पोलिस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. तेथे पोहोचल्यावर कळले की ६० वर्षीय बालाजी गंगाराम मेहत्रे यांनी घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला आहे आणि फाशी लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर पोलिसांनी वेळ न दवडता ताबडतोब दरवाजा तोडण्यास सुरुवात केली, जेणेकरून ते वेळेवर घरात पोहोचून व्यक्तीचा जीव वाचवू शकतील.
१ मिनिट १५ सेकंदांच्या या व्हायरल व्हिडीओत पोलिस घराचा दरवाजा तोडताना दिसत आहेत. व्हिडीओच्या सुमारे १६ व्या सेकंदाला पोलिस दरवाजा तोडून घरात प्रवेश करतात. त्यांना येथे एक व्यक्ती फाशीच्या फंद्याने लटकलेला दिसतो. त्यानंतर पोलीस कर्मचारी त्याला फंद्यातून खाली उतरवून जमिनीवर झोपवतात आणि त्याला CPR देण्यास सुरुवात करतात.
पोलिसांची होत आहे स्तुती
काही वेळातच वृद्ध व्यक्ती श्वास घेण्यास सुरूवात करते. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना ताबडतोब रिक्षात बसवून रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये नेले. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, सध्या बालाजी गंगाराम मेहत्रे यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते धोक्याबाहेर आहेत. आता काळेपडळ पोलिसांच्या बीट मार्शलच्या या त्वरित कारवाईचा व्हीडिओ व्हायरल होत आहे आणि लोक त्यांच्या या कामाची प्रशंसा करत आहेत.
