Supriya Sule : तुम्ही हे देवेंद्र फडणवीस यांना विचारा, जयंत पाटील यांच्या वर्षा बंगला भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Supriya Sule : मतदारसंघ पुनर्रचना बिलासह महिला आरक्षण विधेयकावर खासदार सुप्रिया सुळे आज बोलल्या. यावेळी त्यांनी जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटीवरही भाष्य केलं.

Supriya Sule : तुम्ही हे देवेंद्र फडणवीस यांना विचारा, जयंत पाटील यांच्या वर्षा बंगला भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
Devendra Fadnavis-Supriya Sule
| Updated on: Jul 15, 2026 | 12:53 PM

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रतेसंदर्भात ही भेट घेतली असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. पण तरीही या बैठकीवरुन बरेच तर्क-वितर्क, उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. कारण जयंत पाटील भेटायला गेले, त्यावेळी तिथे सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल होते. आता या विषयावर सुप्रिया सुळे बोलल्या आहेत. “तुम्ही आता मला पण प्रश्न विचारत नाहीत. काल माझा ब्रेकफास्ट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर झाला. लंच डिंपल यादव यांच्याकडे होता. मग तुम्ही मला का विचारत नाहीत, तुम्ही यांना का भेटलात?” असं सुप्रिया सुळे बोलल्या.

“योगीजींकडे वन नेशन, वन इलेक्शन कामासाठी गेले होते. मुख्यमंत्री योगीजींनी आम्हाला गाइड केलं. आम्ही भेटलो, फोटो काढला टि्वट केलं, आभार मानले” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ‘अखिलेश यादव, डिंपल यादव यांच्यासोबत आमचे कौटुंबिक संबंध आहेत’ असं त्या म्हणाल्या. “कोण कोणाला का भेटला? कटकारस्थानासाठी भेटला हे सर्व काढून टाका. जयंतराव काल मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागून गेले होते. मुख्यमंत्र्यांना हे सांगायला गेलेले की, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्षावर चुकीच्या पद्धतीने कारवाई झाली आहे. कारवाईचं टायमिंग बघा, हाऊस सुरु असताना कारवाई झाली नाही” याकडे सुप्रिया सुळे यांनी लक्ष वेधलं. “अधिवेशन संपल्यावर दोन दिवसात कारवाई झाली. जयंतराव अधिकृत गेले होते, हुडी वैगेर घातली नव्हती” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Loading...

पुढच्या दरवाजाने गेले, पुढच्या दरवाजाने आले

“तिथे सुनील तटकरे, प्रफुल पेटल होते, याची उत्तरं माझ्याकडे नाहीत. हा प्रश्न मला विचारण्याऐवजी तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारा. कारण वर्षा बंगल्यावर ते राहतात. बैठक तिथे होती. बंगल्यावर कोण येतं-जातं हे आम्ही कसं सांगणार. आम्ही सामान्य माणसं, साधे विरोधी पक्षाचे खासदार आहोत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्यांना विचारा. आमचे नेते इ्स्लामपूर ईश्वरपूरच्या कामासाठी गेले होते. वेळ मागून घेतलेली. पुढच्या दरवाजाने गेले, पुढच्या दरवाजाने आले” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us