AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : रोहित पवारांनी ऐनवेळी अजितदादांच्या विषयावरची पत्रकार परिषद पुढे ढकलली, येत्या 10 ऑक्टोंबरला ‘मफलरीं’चे कुठले खुलासे होणार?

Rohit Pawar : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी अजित पवारांसंदर्भातील पत्रकार परिषद पुढे ढकलली आहे. रोहित पवारांनी अजित पवारांना उद्देशून भावनिक ट्विट केलं.

Rohit Pawar : रोहित पवारांनी ऐनवेळी अजितदादांच्या विषयावरची पत्रकार परिषद पुढे ढकलली, येत्या 10 ऑक्टोंबरला ‘मफलरीं’चे कुठले खुलासे होणार?
Rohit Pawar-Ajit Pawar
| Updated on: Sep 28, 2026 | 9:46 AM
Share

अक्षय मंकणी, प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी अजित पवारांसंदर्भातील पत्रकार परिषद पुढे ढकलली आहे. रोहित पवारांनी अजित पवारांना उद्देशून भावनिक ट्विट केलं. “तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव सुना सुना” असल्याचं त्यांनी म्हटलं.अजित पवारांसाठीचा आपला लढा थांबलेला नसल्याचंही रोहित पवारांनी स्पष्ट केलं. येत्या 10 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन काही ‘मफलरीं’चे खुलासे करणार असल्याचं रोहित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. निवडणूक आयोगाबाबत देशपातळीवर आणि राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीमुळे आजची पत्रकार परिषद पुढे ढकलल्याचं त्यांनी सांगितलं. रोहित पवार आता 10 ऑक्टोंबरच्या पत्रकार परिषदेत काय नवीन खुलासे करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अजित पवार यांचं यावर्षी 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झालं होतं. त्यानंतर रोहित पवार यांनी सातत्याने हा मुद्दा लावून धरला आहे.

रोहित पवारांनी आज दुष्काळी परिस्थितीवर पत्रकार परिषद घेतली. “शेतकऱ्यांना सगळी मदत करण्याची जबाबदारी ही या सरकारची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं सरसकट पंचमाने हे झाले पाहिजेत. खत,पोट्याश,पेट्रोल आणि डिझेल अशा सगळ्यांची भाव वाढ झाली आहे आणि सगळ्या वस्तू या दुपटीने वाढल्या आहेत. शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च हा वाढला आहे. पण गेल्या 10 वर्षात पिकांचे भाव काही वाढले नाहीत आणि सोयाबीन आमचा चार रुपयाच्या वर कधी गेला नाही. शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. त्याला मदत करण्याची गरज आहे आणि हे सरकारने ते करावं. शेतकरी सध्या सावकाराकडून पैसे ऊसने घेतात आणि त्यांच्या कर्जाच्या बोज्याखाली शेतकरी भरडले जातात” असं रोहित पवार म्हणाले.

हा मुद्दा लावून धरला

अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीला चालले होते. त्यावेळी लँडिंगच्यावेळी हे विमान क्रॅश झालं होतं. या दुर्घटनेत अजित पवारांसह चौघांचा मृत्यू झाला होता. रोहित पवार यांनी सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन हा मुद्दा लावून धरला आहे. अजित पवार व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते. कंपनीच्या मालकाचा सत्ताधाऱ्याशी संबंध असल्याचे दावे करत रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. विमानातील अतिरिक्त इंधन, ब्लॅकबॉक्स डॅमेज अशा अनेक गोष्टींवर बोट ठेवतनाच रोहित पवार यांनी अपघाताच्या चौकशीला का विलंब होतोय? असा सवाल उपस्थित केला.

Follow Us
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका