AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जाणता राजा वाद : उदयनराजेंना शरद पवारांचं पहिलं उत्तर

माजी खासदार आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी जाणता राजा या उपाधीवरुन साधलेल्या निशाण्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawars answer to Udayanraje Bhonsale) यांनी त्यावर भाष्य केलं आहे.

जाणता राजा वाद : उदयनराजेंना शरद पवारांचं पहिलं उत्तर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jan 15, 2020 | 3:36 PM
Share

सातारा : माजी खासदार आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी जाणता राजा या उपाधीवरुन साधलेल्या निशाण्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawars answer to Udayanraje Bhonsale) यांनी त्यावर भाष्य केलं आहे. खटाव- माण साखर कारखान्याच्या 251001 व्या साखर पोत्याचे पूजन शरद पवारांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पवारांनी जाणता राजा यावरुन उदयनराजेंनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. (Sharad Pawars answer to Udayanraje Bhonsale)

शरद पवार म्हणाले, “मी कुठेच म्हणालो नाही की मला जाणता राजा म्हणा. जाणता राजा हा शब्द रामदास स्वामींनी आणला. शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास नव्हते. तर जिजाऊ या गुरु होत्या. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते ही लेखणीची कमाल आहे. छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी आहे”.

याशिवाय इथे (कार्यक्रमाला) आल्यापासून सगळे पत्रकार प्रतिक्रियेसाठी माझ्या मागे लागले आहेत. मात्र मी तरी कोणाला बोललो नाही. रामराजे निंबाळकर (उदनयराजेंवर) बोलायला पुरशे आहेत. मी कुठेच नाही म्हणालो मला जाणता राजा  म्हणा. शिवचरित्राचा व्यवस्थित अभ्यास केल्यास जाणता राजा ही उपाधी शिवाजी महाराजांना कधीच लावण्यात आली नव्हती. शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास स्वामी नव्हते. तर जिजाऊ या गुरू होत्या. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास होते ही लेखणीची कमाल. लेखणीची छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी, असं म्हणत शरद पवारांनी उदयनराजेंना उत्तर दिलं.

उदयनराजे काय म्हणाले होते?

या जगात जाणता राजा फक्त छत्रपती शिवराय होते. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली का ते कळत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाची तुलना होऊ शकत नाही. छत्रपती शिवरायांच्या जवळही जाण्याची कोणाची लायकी नाही”, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

सो कॉल्ड जाणते राजे कोणी त्यांना उपमा दिली माहिती नाही. आरक्षणाचा विषय का लांबवता. शिवसेनेने इतिहास संशोधक आहात असं म्हणत माफी मागितली.कोणताही पक्ष असला तरी सोयीप्रमाणे सर्वजण त्यांचं नाव का घेता.  त्यांचं आचरण केलं असतं तर ही परिस्थिती आली नसती. हे तुम्ही लोकांनी निवडून दिलेले लोकशाहितले राजे जाणते राजे म्हणे. राज्याच्या खेळळांडो केलाय, किळस वाटते.

संबंधित बातम्या  

जाणता राजा फक्त छत्रपती शिवराय, उदयनराजेंचा हल्लाबोल, पवार, ठाकरेंवर घणाघात

उदयनराजेंनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे : संजय राऊत

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.