Sachin Kharat | दमबाजी करणाऱ्या शरद पोंक्षेंवर गुन्हा दाखल करा, रिपब्लिकन पार्टीचे सचिन खरात यांची मागणी, काय आहे नेमकं प्रकरण?

शरद पोंक्षे यांच्या वक्तव्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे सचिन खरात यांनी शरद पोंक्षे यांना इशारा दिला आहे.

Sachin Kharat | दमबाजी करणाऱ्या शरद पोंक्षेंवर गुन्हा दाखल करा, रिपब्लिकन पार्टीचे सचिन खरात यांची मागणी, काय आहे नेमकं प्रकरण?
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 9:30 AM

मुंबईः महाराष्ट्रात सावरकर (Veer Sawarkar) प्रेमींची दहशत वाढली पाहिजे, त्यांच्याकडे पाहिले तर लोकांनी घाबरलं पाहिजे, असं वक्तव्य करणाऱ्या अभिनेते शरद पोक्षेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी रपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणीही खरात यांनी केली आहे. महाराष्ट्र हा फुले, शाहू आंबेडकरांचा असून राज्यातील जनतेला अशी दमबाजी सहन होणार नाही, हे शरद पोक्षेंनी लक्षात घ्यावं, असा इशाराही सचिन खरात यांनी दिला आहे. विं. दा. सावरकर यांच्या जीवनावर आधारीत एक कार्यक्रम काल पुण्यात पार पडला. या कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी जमलेल्या प्रेक्षकांना संबोधून त्यांनी हे वक्तव्य केल्याने काही राजकीय गट नाराज आहेत.

शरद पोक्षेंचं वक्तव्य काय?

सावरकर यांच्या जीवनावरील आधारीत कार्यक्रमाचं कौतुक करताना शरद पोंक्षे म्हणाले, एवढ्या कार्यक्रमापुरते थांबू नका. सावरकर हे फार मोठे माणूस होते. एवढ्या मोठ्या देशभक्ताचा जेवढा अपमान केला जातो, तो आतापर्यंत इतर कुणाचाही झालेला नाही. आता सावरकर यांची दहशत वाढली पाहिजे. यापुढे सावरकर प्रेमी आला म्हटलं की, दहशत वाढली पाहिजे. सावरकर यांची दहशत ब्रिटिशांना होती, तसेच काँग्रेसलाही होती. ती दहशत वाढली पाहिजे, असं वक्तव्य अभिनेते शऱद पोंक्षे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केलं. यावरून सध्या वाद सुरु आहे.

सचिन खरात यांचा इशारा काय?

शरद पोंक्षे यांच्या वक्तव्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे सचिन खरात यांनी शरद पोंक्षे यांना इशारा दिला आहे. महाराष्ट्रात अशी दमबाजी चालणार नाही. महाराष्ट्र राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांचेच आहे हे शरद पोंक्षे यांनी ध्यानात ठेवावे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेते शरद पोंक्षे यांच्या वक्तव्याची दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा. पोंक्षे यांचे वक्तव्य अत्यंत नींदनीय असल्याचं खरात यांनी म्हटलंय.

घोडा झाला तरी… शरद पोंक्षेंची कुणावर टीका?

सावरकरांच्या जीवनावर आधारीत कार्यक्रमात लहान मुलांची स्तुती करताना शरद पोंक्षे यांनी अप्रत्यक्षरित्या राहुल गांधींवर टीका केली. ही मुलं बघा अन् दिल्लीतला मुलगा बघा, या मुलांना कळतंय आणि एवढा मोठा घोडा झाला तर अजून गोळवलकर बोलता येत नाही, असी टीका शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांचं नाव न घेतला केली.

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.