संकटांची मालिका सुरु असतांना ‘तिची’ जिद्द कायम आहे, आव्हानं पेलण्याची ताकद पाहून तुम्हालाही सलाम करावा वाटेल
दीक्षाला शिकण्याची प्रचंड आवड आहे. शिक्षणाची ओढ असलेली ही विद्यार्थिनी आलेल्या प्रत्येक संकटाशी सामना करून ते परतवून लावत आहे. आलेल्या संकटाचे भांडवल न करता सामान्य विद्यार्थ्यांसारखे ती शिक्षण घेऊन पुढे जात आहे.

शैलेश पुरोहित, टीव्ही 9 मराठी, इगतपुरी ( नाशिक ) : कधी-कधी संकटांची मालिका सुरू झाली की माणूस हतबल होऊन जातो, पण संकटे त्याच्याच वाट्याला येतात ज्याच्यामध्ये पेलण्याची ताकद असते. याचीच प्रचिती सध्या नाशिकच्या इगतपुरी ( Nashik News ) तालुक्यामध्ये येत आहे. वयाच्या आठव्या वर्षी तिला ब्रेन ट्यूमर ( Brain Tumor ) सारखा आजार जडला. एकदा नाहीतर तर तीन वेळा ब्रेन ट्यूमरची तिच्यावर शस्रक्रिया पार पडलीय. याच काळात तिची दहावीची परीक्षा असतांना महिनाभरापूर्वी तिच्यावर पुन्हा शस्रक्रिया होणार होती पण ती पुढे ढकलली. मात्र याच शस्त्रक्रियांमुळे हळूहळू तिची दृष्टी नाहीशी होत गेली आणि वयाच्या दहाव्या वर्षी पूर्णतः अंध झाली आहे. इगतपुरी येथील दिशा गजानन काकडे हिच्यावर ही संकटांची मालिका कोसळली आहे.
दीक्षाचे सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. परीक्षा देत असतांना दीक्षाला लिहिण्याची अडचण आहे. मात्र, अवघ्या महिनाभरात ब्रेल लिपी शिकून ती या परीक्षेला सामोरे जात आहे. एका दुसऱ्या वर्गातील विद्यार्थीनीच्या सहाय्याने ती शिक्षण पूर्ण करत आहे.
दीक्षाला शिकण्याची प्रचंड आवड आहे. शिक्षणाची ओढ असलेली ही विद्यार्थिनी आलेल्या प्रत्येक संकटाशी सामना करून ते परतवून लावत आहे. आलेल्या संकटाचे भांडवल न करता सामान्य विद्यार्थ्यांसारखे ती शिक्षण घेऊन पुढे जात आहे.
दीक्षा जिल्हाधिकारी बनायचे आहे. त्यासाठी ती दिवसरात्र मेहनत घेऊन अभ्यास करत आहे. दृष्टी हळूहळू गेली असली तरी इतरांच्या मदतीने तिने शिक्षणाची जिद्द सोडलेली नाही. विशेष म्हणजे सर्वच विषयात दीक्षा पारंगत आहे.
अतिशय चाणाक्ष आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असलेली विद्यार्थिनी म्हणून तिची ओळख आहे. दुर्दैव असे की तिच्या वाट्याला ब्रेन ट्यूमर सारखा आजार आला आहे. त्यामुळे हळूहळू तिची दृष्टीही गेल्याचे सांगितले जात आहे.
असे अनेक विद्यार्थी असतात की ते एखादे संकट आले तर त्याचे भांडवल करून शिक्षणापासून पळवाट शोधत असतात. पण दीक्षाने उलट करून एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अपंगत्वाचा बाऊ न करता मदतीविना दिशा शिक्षण घेत आहे.
ब्रेल लिपी शिकण्याकरिता कमीत कमी सहा महिन्यांचा अवधी लागतो. तेव्हा काही प्रमाणात ब्रेल लिपी अवगत होते. मात्र, अवघ्या महिनाभरात दीक्षाने अवघड अशी लिपी अवगत केली आहे. त्यामुळे दीक्षाचे विशेष कौतुक होत आहे.
दीक्षाची ही जिद्द पाहून शाळेचे प्राचार्य, तिचे शिक्षक, शिक्षणाअधिकारी हे तिचे कौतुक करत असून शुभेच्छा देत आहे. दीक्षावर आलेल्या संकटामुळे ती खचून न जाता पुढे शिक्षण घेऊन जिल्हाधिकारी बनायचे असल्याचे सांगत असल्याने तिच्या जिद्दीचे कौतुक केले जात आहे.
