AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्याची जबाबदारी वाढली”;शिंदे गटाच्या नेत्यानं संजय राऊतांना सुनावलं

धनुष्यबाण हे आमचं चिन्ह आहे हे आता तुमचा म्हणायचा अधिका नाही कारण हे चिन्ह तु्म्ही सत्तेसाठी विकलं आहे अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्याची जबाबदारी वाढली;शिंदे गटाच्या नेत्यानं संजय राऊतांना सुनावलं
| Updated on: Feb 19, 2023 | 12:38 AM
Share

खेड/रत्नागिरीः शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आले आहेत. त्यातच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाची तुलना कुत्र्याबरोबर केल्याने हे प्रकरण अधिकच चिघळले आहे. ठाकरे गटावर टीका करताना शिंदे गटाचे नेते योगेश कदम यांनी टीका करताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता 15 आमदार होते ते आता 10 असल्याची टीका त्यांनी केली आहे.

खासदार संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी म्हटले की, तुमच्या मनातला धनुष्यबाण तुम्ही विकला आहे. तेही मुख्यमंत्री पदासाठी विकला आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

धनुष्यबाण हे आमचं चिन्ह आहे हे आता तुमचा म्हणायचा अधिका नाही कारण हे चिन्ह तु्म्ही सत्तेसाठी विकलं आहे अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

वाढदिवसाच्या पूर्व संध्येला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालामुळे हे वाढदिवसानिमित्त भेटलेली भेट असल्याची भावनाही योगेश कदम यांनी व्यक्त केली आहे. ज्यावेळी चिन्ह आणि पक्षाचा निकाला लागला तो खरं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय आहे. आणि बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्याची जबाबदारी आता वाढली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी योगेश कदम यांनी सांगितले की, सत्ता मिळवण्यासाठी हाणामारी नको होती. मात्र सत्तेसाठी ठाकरे गटाने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार दूर केले असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला.

त्यामुळे आता शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह या दोन्ही गोष्टी मिळाल्या आहेत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांची ज्या प्रमाणे शिकवण होती की, अंगावर येणार तर शिंगावर घेणार त्याप्रमाणे आजच्या घडीला शिंदे गटाची वाटचाल चालू आहे,

अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. यावेळी योगेश कदम यांनी दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांना विधिमंडळ पाहता येणार नसल्याचा विश्वास नाही.

ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे आपल्याला काहीच फरक पडणार नाही. सध्या आमचा अधिकृत पक्ष आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे आमची ताकद आता वाढली आहे. या गोष्टीमुळे आता आम्ही विकास करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.