मोठी बातमी! शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेस एकत्र; भाजपला जबर धक्का, ज्याची भीती होती नेमकं तेच घडलं
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून भाजपला मोठा धक्का देण्यात आला आहे. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. भंडाऱ्यामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गटाने आपलाच मित्र पक्ष असलेल्या भाजपाला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीमधून मोठी बातमी समोर आली आहे. भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाने काँग्रेससोबत हातमिळवणी करून, भाजपाविरोधात उठाव केला. परिणामी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सत्ता भाजपला गमवावी लागली असून, इथे आता शिवसेना शिंदे गटाचा सभापती निवडून आला आहे.
भंडाऱ्यात आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणूक पार पडली. सत्तेत असलेल्या भाजपने अडीच वर्षांपूर्वी दिलेली लेखी आश्वासन न पाळल्याने महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट, आणि शिवसेना शिंदे गटाने काँग्रेससोबत हातमिळवणी करत भाजपच्या सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणला होता. आज या उठावाचा निकाल समोर आला असून, 18 सदस्य संख्या असलेल्या या बाजार समितीमध्ये भाजपचे 3 सदस्य अनुपस्थित राहिल्याने 15-0 अशा एकतर्फी मतांनी शिवसेनेच्या आशू वंजारी यांनी सभापती पदाची ही निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे आता भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेनेची सत्ता आली असून, भाजपावर मात्र सत्तेपासून दूर राहण्याची वेळ आली आहे.
सातारा जिल्हा बँक निवडणुकीतही भाजपला धक्का
दरम्यान दुसरीकडे भाजपला सातारा जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत देखील शिवसेना शिंदे गटाने मोठा झटका दिला आहे. सातारा जिल्हा बँकेत भाजपचे सर्वाधिक 9 संचालक असताना देखील या बँकेत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष झाले आहेत. या बँकेत अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बारा मतांची गरज होती. भाजपकडील सदस्यांची संख्या 9 होती, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडील सदस्यांची संख्या आठ तर शिवसेना शिंदे गटाकडे चार सदस्य होते. शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 8 सदस्य तसेच शिवसेनेचे चार सदस्य असा बहुमताचा आकडा गाठल्याने भाजपाची अध्यक्षपदाची संधी हुकली, तर या बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपदाची आणि शिवसेना शिंदे गटाला उपाध्यक्षपदाची संधी मिळाली.