AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, म्हणाले, मंत्र्यांच्या आदेशानुसार…’

Jalgaon news : जळगावमधील शिंदे गटाच्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, म्हणाले, मंत्र्यांच्या आदेशानुसार...'
Eknath shinde newImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 25, 2026 | 2:43 PM
Share

राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरूच आहे. आता मित्रपक्षच एकमेकांचे नेते, कार्यकर्ते फोडू लागले आहेत. एका दिवसाआधी टिटवाळ्यात काँग्रेसने ठाकरे गटाचे कार्यकर्ते फोडले. अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसची वाट धरली. ठाकरे गटानंतर शिंदे गटाला मोठा हादरा बसला आहे. जळगावातील बड्या नेत्याने एकनाथ शिंदेंची साथ सोडली आहे. पक्षातील नेत्यांवर नाराजी व्यक्त करत तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांसह सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.

जळगावातील शिंदे गटाचे माजी संपर्कप्रमुख निलेश पाटील यांच्या कार्यकर्त्यासह सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अनिल पाटील , स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत निलेश पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश केला. यामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि मतभेदामुळे वर्षभरापूर्वी निलेश पाटील यांनी शिंदे गटाच्या संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिला. शिवसेनेत असताना चुकीची वागणूक आणि अन्याय झाल्याचा निलेश पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला.  मंत्र्यांच्या आदेशानुसार पक्षाच्या बैठकांना बोलवलं जात नव्हते. निरोप दिले जात नव्हते. मनपा निवडणुकीत उमेदवारी न देता डावललं,  असा आरोप करत त्यांनी शिंदे गटाची साथ सोडली.

ठाणे जिल्ह्यात ठाकरे गटाला धक्का 

ठाणे विभागातील टिटवाळा भागातील ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मुंबईत शनिवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन येथील कार्यालयात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थिती प्रवेश केला.  या सर्व पदाधिकाऱ्यांनी कल्याण शहर जिल्हा काँग्रेस जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष अॅड. नवीन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख नसरू शेख, अल्पसंख्याक विभागाचे ठाणे जिल्हा महासचिव असलम सोयान यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त केला. या प्रवेशासाठी कल्याण शहर जिल्हा काँग्रेस समितीचे नवीन सिंग यांनी पुढाकार घेतला होता. या पक्षप्रवेशानंतर काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचा दावा केला. तसेच पक्ष संघटना अधिक बळकट होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

Follow Us
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती..
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती लागली आहे....
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी