शिवसेना आमदार कांदे अन् अक्षय निकाळजे यांची पोलीस आयुक्त करणार चौकशी

| Updated on: Oct 23, 2021 | 12:31 PM

शिवसेना आमदार सुहास कांदे आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे यांची आता स्वतः पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे चौकशी करणार आहेत. त्यामुळे या राज्यभर गाजलेल्या वादातून नेमके काय समोर येणार, याकडे लक्ष लागले आहे.

शिवसेना आमदार कांदे अन् अक्षय निकाळजे यांची पोलीस आयुक्त करणार चौकशी
सुहास कांदे आणि अक्षय निकाळजे.
Follow us on

नाशिकः शिवसेना आमदार सुहास कांदे आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे यांची आता स्वतः पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे चौकशी करणार आहेत. त्यामुळे या राज्यभर गाजलेल्या वादातून नेमके काय समोर येणार, याकडे लक्ष लागले आहे.

खरे तर आमदार सुहास कांदे आणि अक्षय निकाळजे यांच्यातील बहुचर्चित वादाची चौकशी पोलिसांनी पूर्ण केली असून, त्यांनी आपला अहवाल पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांना सादर केला आहे. ते आता यावर काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, आता स्वतः पोलीस आयुक्त या दोघांची चौकशी करणार असल्याने यातून काय बाहेर येईल, याची उत्सुकता आहे.

नेमके प्रकरण काय ?

नियोजन समितीचा निधी विकल्याबाबत छगन भुजबळांविरोधात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी म्हणून शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी आपल्याला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचे म्हटले होते. त्यामुळे साहजिकच एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे कांदे यांनी याबाबत पोलिस आयुक्तांना पत्र देत तक्रार केली होती. मात्र, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचा पुतण्या अक्षय निकाळजे यांनी आमदार कांदे यांचे सारे आरोप फेटाळून लावले होते. आमदार सुहास कांदे यांचे भाऊ टोलनाका चालवतात. या टोलनाक्यावर आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती. त्यासाठी मी सुहास कांदे यांना फोन केला होता. त्यांना फोनवर मी कुठलिही धमकी दिली नाही. छगन भुजबळांविरोधातली याचिका मागे घ्या, असे म्हणालो नाही. मी कधीही मंत्री छगन भुजबळ यांना भेटलो सुद्धा नाही. त्यामुळे मी आमदारांचीच तक्रार करणार आहे. त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार आहे. त्यांनी लोकप्रियतेसाठी हे केले. माझा भुजबळांचा काहीही संबंध नाही, असा दावा निकाळडे यांनी केला होता. या साऱ्या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते.

चौकशीत नेमके काय झाले ?

पोलिसांच्या चौकशीदरम्यान आमदार कांदे आणि निकाळजे हे कुठलेही कॉल रेकॉर्डिंग सादर करण्यास असमर्थ ठरले. निकाळजे यांनी कांदे यांना फोन केला होता. मात्र, तो कशासाठी, हे त्यांच्याकडे कॉल रेकॉर्डिंग नसल्याने ठोस सांगता आले नाही. शिवाय कांदे यांनाही फोन याच कारणासाठी आला होता, हे पटवून देता आले नाही. मात्र, यावेळी कांदे आपल्या दाव्यावर ठाम होते.

कुणा-कुणाचे घेतले जबाब ?
चौकशीदरम्यान पोलिसांनी शिवसेना आमदार सुहास कांदे आणि अक्षय निकाळजे यांच्यासह पाच जणांचे जबाब नोंदवल्याचे समजते. हा चौकशी अहवाल पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. त्यानंतर आता पोलीस आयुक्त स्वतः या दोघांची चौकशी करणार असल्याचे समजते. दोघेही कॉल रेकॉर्डिंग सादर करण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या चौकशीतून काय बाहेर येणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्याः

कार्यक्रमाला तोबा गर्दी होते, पण काँग्रेस का निवडून येत नाही; त्र्यंबकेश्वरमध्ये थोरातांचा मूलभूत प्रश्न

गॅस सिलिंडर स्फोटाने नाशिक हादरले; 6 कामगार भाजले, सहा महिन्यांत 13 जणांचा मृत्यू