AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार्यक्रमाला तोबा गर्दी होते, पण काँग्रेस का निवडून येत नाही; त्र्यंबकेश्वरमध्ये थोरातांचा मूलभूत प्रश्न

काँग्रेसचा कार्यक्रम म्हटला की, तोबा गर्दी होते. बसायला जागा मिळत नाही. आता आपल्याच कार्यक्रमाचे पाहा. असे वाटते, काँग्रेसला अच्छे दिन आले आहेत. मात्र, मतदान झाल्यावर आपले माणसे का निवडून येत नाहीत, असा मूलभूत प्रश्न महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना पडला आहे.

कार्यक्रमाला तोबा गर्दी होते, पण काँग्रेस का निवडून येत नाही; त्र्यंबकेश्वरमध्ये थोरातांचा मूलभूत प्रश्न
बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री
| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 11:59 AM
Share

नाशिकः काँग्रेसचा कार्यक्रम म्हटला की, तोबा गर्दी होते. बसायला जागा मिळत नाही. आता आपल्याच कार्यक्रमाचे पाहा. असे वाटते, काँग्रेसला अच्छे दिन आले आहेत. मात्र, मतदान झाल्यावर आपले माणसे का निवडून येत नाहीत, असा मूलभूत प्रश्न महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पडला असून, तो त्यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या जाहीर कार्यक्रमात उपस्थितांना विचारला. तेव्हा सारेच क्षणभर आवाक झाले.

त्र्यंबकेश्वरमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचा आढावा बैठक झाली. यावेळी थोरातांना हा प्रश्न केला. या बैठकीला आमदार सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे आदी उपस्थित होते. बैठकीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेसचा कुठलाही कार्यक्रम म्हटला की खूप गर्दी होते. त्या कार्यक्रमाची नंतर चर्चाही होते. आता आपल्याच कार्यक्रमाचे पाहा. असे वाटते, काँग्रेसला अच्छे दिन आले आहेत. मात्र, मतदान झाल्यावर आपले माणसे का निवडून येत नाहीत, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थितांना केला. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसने वर्चस्व राखले आहे. सध्या सगळीकडे काँग्रेसचे वारे आहे, असे सांगायलाही थोरात विसरले नाहीत. यावेळी थोरात यांनी जिल्हा भरातील पंधरा तालुक्यातील कामांचा आढावा घेतला. कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. या कार्यक्रमाला आमदार प्रणिती शिंदेही उपस्थित होत्या. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आमदार शिंदे म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाला सुमारे एकशे चाळीस वर्षांची परंपरा आहे. राष्ट्रीयत्व जपणारा एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस आहे, असा दावा त्यांनी केला. सोबतच, काँग्रेसचा कार्यकर्ता हाच देशाचा कार्यकर्ता होय. देशात फक्त काँग्रेसमुळेच राष्ट्रीय एकात्मता टिकून आहे. उम्मीदसे दुनिया कायम होती, ती उम्मीद आपण ठेवू या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

काँग्रेसचा कार्यक्रम म्हटला की, तोबा गर्दी होते. बसायला जागा मिळत नाही. आता आपल्याच कार्यक्रमाचे पाहा. असे वाटते, काँग्रेसला अच्छे दिन आले आहेत. मात्र, मतदान झाल्यावर आपले माणसे का निवडून येत नाहीत. – बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री

काँग्रेस पक्षाला सुमारे एकशे चाळीस वर्षांची परंपरा आहे. राष्ट्रीयत्व जपणारा एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता हाच देशाचा कार्यकर्ता होय. देशात फक्त काँग्रेसमुळेच राष्ट्रीय एकात्मता टिकून आहे. – प्रणिती शिंदे, आमदार

इतर बातम्याः

गॅस सिलिंडर स्फोटाने नाशिक हादरले; 6 कामगार भाजले, सहा महिन्यांत 13 जणांचा मृत्यू

‘आयटीआय’ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू; नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना येथे करता येईल अर्ज!

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.