गॅस सिलिंडर स्फोटाने नाशिक हादरले; 6 कामगार भाजले, सहा महिन्यांत 13 जणांचा मृत्यू

स्वयंपाक करायला गॅस सुरू करण्यासाठी काडीपेटी पेटवली असता झालेल्या भीषण स्फोटाने 6 कामगार भाजल्याची घटना नाशिकमधल्या कुमावतनगरमध्ये घडली आहे. यातले दोन कामगार नव्वद टक्के भाजल्याचे समजते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गॅस सिलिंडर स्फोटाने नाशिक हादरले; 6 कामगार भाजले, सहा महिन्यांत 13 जणांचा मृत्यू
नाशिकमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन सहा कामगार जखमी झाले आहेत.
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 11:01 AM

नाशिकः स्वयंपाक करायला गॅस सुरू करण्यासाठी काडीपेटी पेटवली असता झालेल्या भीषण स्फोटाने 6 कामगार भाजल्याची घटना नाशिकमधल्या कुमावतनगरमध्ये घडली आहे. यातले दोन कामगार नव्वद टक्के भाजल्याचे समजते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची सविस्तर माहिती अशी की, कुमावतरनगरमध्ये सहा कामगार एकत्र रहायचे. ते परराज्यातील असून टाइल्स बसवण्याचे काम करतात. शुक्रवारी सकाळी त्यांना कामावर जायची घाई होती. सकाळचा स्वयंपाक करायला गॅस सुरू करण्यासाठी त्यांच्यातील एकाने काडीपेटीची काडी पेटवली. तेव्हा गॅस सिलिंडरचा भडका उडून मोठा स्फोट झाला. या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला. यामध्ये लवलेश धरम पाल (रा. अदालतपूर, उत्तर प्रदेश), अखिलेख धरमपाल, विजयपाल फत्तेपूर, संजय मौर्य, अरविंद पाल, वीरेंद्रकुमार (सर्व रा. फतेहपूर, उत्तर प्रदेश) हे गंभीर जखमी झाले आहेत. यातले दोघे मजूर नव्वद टक्के भाजले असल्याचे समजते. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

6 महिन्यांत 13 मृत्यू

गॅस गळतीमुळे 6 महिन्यांत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. एप्रिलमध्ये सारडा सर्कल येथील संजरीनगर सोसायटीत गॅस सिलिंडर बदलताना गळती झाली. या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला होता. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील भारतनगर झोपडपट्टीमध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन पाच युवकांचा बळी गेला होता. तर चार सप्टेंबर रोजी एका हॉटेलमध्ये गॅस स्फोट झाल्याची घटना घडली होती. यात स्वयंपाकी रूपेश गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान, नागरिकांनी दक्षता घेतली आणि काही नियम पाळले तर गॅस सिलिंडर गळतीचे अपघात रोखले जाऊ शकतात. त्यासाठी फक्त थोडी दक्षता घ्यावी लागेल.

गॅस गळती होऊ नये म्हणून ही दक्षता घ्या

– गॅस सिलिंडरचे रेग्युलेटर रात्री झोपण्यापूर्वी बंद करावे. – रेग्युलेटरला अडकावलेले पांढरे झाकण रात्री सिलिंडरला लावावे. – गॅसचा थोडाही वास आल्यास घराचे दरावाजे, खिडक्या तात्काळ उघडा. – काडीपेटी, लायटर पेटवू नका. पंखे, बल्बही सुरू करू नका. – गॅसचा वास जाईपर्यंत काळजी घ्या. – गॅस गळती झाल्यास सिलिंडर घराबाहेर अथवा मोकळ्या जागेत न्यावे. – घरात गॅसने पेट घेतल्यास चादर पाण्यात बुडवून ती सिलिंडर भोवती गुंडाळा.

इतर बातम्याः

‘आयटीआय’ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू; नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना येथे करता येईल अर्ज!

लसीकरणाचा विक्रमः नाशिक विभाग राज्यात नंबर 1; एक कोटी 30 लाख नागरिकांना टुचुक!

गोदाकाठच्या 100 मीटर परिसरात नो प्लास्टिक झोन; नाशिक महापालिकेचा निर्णय

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.