AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लसीकरणाचा विक्रमः नाशिक विभाग राज्यात नंबर 1; एक कोटी 30 लाख नागरिकांना टुचुक!

एकीकडे संपूर्ण देशात शंभर कोटी नागरिकांचे लसीकरण झाले असताना, दुसरीकडे नाशिक विभागाने विभागाने राज्यात विक्रमी आघाडी घेत तब्बल 1 कोटी 29 लाख 34 हजार 893 नागरिकांचे लसीकरण केले आहे.

लसीकरणाचा विक्रमः नाशिक विभाग राज्यात नंबर 1; एक कोटी 30 लाख नागरिकांना टुचुक!
संग्रहित छायाचित्र.
| Updated on: Oct 22, 2021 | 6:39 PM
Share

मनोज कुलकर्णी, नाशिकः  एकीकडे संपूर्ण देशात शंभर कोटी नागरिकांचे लसीकरण झाले असताना, दुसरीकडे नाशिक विभागाने विभागाने राज्यात विक्रमी आघाडी घेत तब्बल 1 कोटी 29 लाख 34 हजार 893 नागरिकांचे लसीकरण केले आहे. नाशिक विभागाला पुरेसा लससाठा प्राप्त झाल्यामुळे हे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे.

देशात 16 जानेवारी 2021 रोजी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देणे सुरू झाले. प्रथम आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर व नंतर 1 मे 2021 पासून सर्व 18 वर्षावरील व्यक्तींना हे लसीकरण सुरू झाले. सुरुवातीला जनतेचा मनातील संभ्रम व लसीची भीती यामुळे डोस घेण्याचे प्रमाण जरी कमी असले, तरी लस सुरक्षित व लाभदायक असल्याचे समजल्यामुळे हळूहळू कोरोना लसीकरण करून घेण्यासाठी रांगा लागत असल्याचे चित्र अनेक शहरात अनेकदा दिसून आले. लसीकरण करून घेणाऱ्यांचे प्रमाणदेखील जनजागृतीमुळे वाढत गेले. सर्वत्र लसीचे डोस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ लागले. आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने कोरोना लसीचे मोफत डोस घेण्याचे प्रमाण वाढत जाऊन या जागतिक कोरोना महामारीपासून संरक्षण करण्यात मोठे यश आले आहे. नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांसाठी वेळोवेळी आज अखेर कोव्हॅक्सिन 15,99,370 डोसेस आणि कोविडशिल्ड 1,17,61,820 डोसेस शासनाकडून प्राप्त झाले आहेत. या दोन प्रकारच्या कोरोना लसीचे एकूण 1,33,61,190 डोसेस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज अखेर विभागात 1, 29, 34, 893 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तांकडून देण्यात आली.

लसीकरण आलेख चढताच

महाराष्ट्रात आजपर्यंत 9 कोटी 43 लाख 21 हजार लसीकरणाचे डोसेस दिलेले असून 18 वर्षे वरील वयोगटात 70% पहिला डोस व 29% दुसरा डोस पूर्ण केले आहेत, त्यात नाशिक विभागाचा विक्रमी वाटा आहे. नाशिक विभागात तब्बल 1,29,34,893 डोसेस देऊन कोरोना महामारीस संरक्षक ठरेल असे लसीकरण झाले आहे आणि यासाठी आरोग्य विभागास जनतेचा व लोकप्रतिनिधींचा सहभागामुळेच इतके लसीकरण पूर्ण करणे शक्य झाले आहे.पुढेही असाच चढता आलेख राहील, असा आरोग्य यंत्रणेस विश्वास आहे.

नाशिक जिल्हा

नाशिक जिल्ह्यात एकूण 45 लाख 12 हजार 691 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 32 लाख 90 हजार 262 जणांनी पहिला डोस घेतला असून 12 लाख 22 हजार 429 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

अहमदनगर, धुळे

अहमदनगर जिल्ह्यात एकूण 32 लाख 52 हजार 514 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 24 लाख 10 हजार 016 जणांनी पहिला डोस घेतला असून 08 लाख 42 हजार 498 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. धुळे जिल्ह्यात एकूण 14 लाख 32 हजार 592 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 09 लाख 79 हजार 876 जणांनी पहिला डोस घेतला असून 04 लाख 52 हजार 716 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

जळगाव, नंदुरबार

जळगाव जिल्ह्यात एकूण 27 लाख 09 हजार 094 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 20 लाख 36 हजार 779 जणांनी पहिला डोस घेतला असून 06 लाख 72 हजार 315 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकूण 10 लाख 28 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 07 लाख 710 जणांनी पहिला डोस घेतला असून 03 लाख 27 हजार 292 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

लसीकरण केल्यास करात सूट

कोरोना प्रतिबंधक लस जर घेतली नाही तर गावात फिरु देणार नाही, असा डॅशिंग निर्णय निफाड तालुक्यातील कसबे सुकाणे या ग्रामपंचायतीने घेतला आहे. निफाड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्या कारणाने लसीकरण गरजेचे आहे. याकरता कसबे सुकेणे या ग्रामपंचायतीने डॅशिंग निर्णय घेतलाय. कसबे सुकेणे या ग्रामपंचायतीने डॅशिंग निर्णय घेताना स्पष्टीकरण दिलंय, गावातील जे ग्रामस्थ लस घेणार नाही, त्यांना गावात फिरु दिले जाणार नाही तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकाचे सुद्धा लसीकरण अनिवार्य असल्याचे ग्रामपंचायतीने सांगितलं आहे.

पुढील काळात लवकरच उर्वरित लाभार्थ्यांना कोरोना लसीचे दोन डोस देऊन संरक्षित करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केलेले आहे. येत्या 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सर्व उर्वरित तरुण युवक युवतींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. मिशन युवा स्वास्थ्य ही मोहीम मिशन स्वरूपात राबविली जाणार आहे. त्याचे सुक्ष्म कृती आराखडा आखणे सुरू झाले असून त्यात आरोग्य यंत्रणेला शाळा, महाविद्यालयांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. – राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक

इतर बातम्याः

गोदाकाठच्या 100 मीटर परिसरात नो प्लास्टिक झोन; नाशिक महापालिकेचा निर्णय

चर्चा तर होणारचः शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते संजय राऊत उद्यापासून नाशिक दौऱ्यावर

कार्यालयात हेल्मेटशिवाय प्रवेश नाही; नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांची अनोखी मोहीम

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.