कार्यालयात हेल्मेटशिवाय प्रवेश नाही; नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांची अनोखी मोहीम

चंदन पुजाधिकारी

| Edited By: |

Updated on: Oct 22, 2021 | 12:12 PM

नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांनी आता अनोखी हेल्मेट सक्ती केली आहे. त्यानुसार शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात आता हेल्मेटशिवाय प्रवेश मिळणार नाही.

कार्यालयात हेल्मेटशिवाय प्रवेश नाही; नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांची अनोखी मोहीम
दीपक पांडेय, पोलीस आयुक्त, नाशिक.
Follow us

नाशिकः नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांनी आता अनोखी हेल्मेट सक्ती केली आहे. त्यानुसार शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात आता हेल्मेटशिवाय प्रवेश मिळणार नाही.

नाशिकमध्ये दुचाकीस्वारांचे अपघात सत्र थांबताना दिसत नाही. ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट, नो पट्रोल धोरण सुरू केले होती. ही मोहीम चांगलीच चर्चेत राहिली. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांचे समुपदेशन सुरू केले. त्यानुसार दुचाकीस्वारांना लगेच दंडाची पावती नाही, तर दोन तासांच्या समुपदेशनाचा डोस दिला. या उपदेशानंतर संबंधितांस एक प्रमाण पत्र देऊन सोडण्यात आले. आता या मोहिमेनंतर पुन्हा एकदा पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी आता आणखी एक नवी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार नाशिक शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये आता विनाहेल्मेट प्रवेश दिला जाणार नाही. तसे आदेशच त्यांनी काढले आहेत. सहा नोव्हेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या मोहिमेस नाशिककर कसा प्रतिसाद देतात, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

इतर वेळी पाचशे रुपयांचा दंड

विना हेल्मेट प्रवास करणाऱ्यास पाचशे रुपये, ट्रिपल सीट प्रवास करण्यास दोनशे रुपये, सिग्नल तोडणाऱ्यास दोनशे रुपये, राँगसाइड वाहन चालवणाऱ्यास पोलिस हजार रुपयांचा दंड आकारतात. मात्र, अनेक नागरिक दंड भरण्यास टाळाटाळ करतात. दंड ठोठावला तरी पोलिसांशी हुज्जत घालतात. तर अनेक ठिकाणी पोलिसच तोडपाणी करून वाहनधारकाला सोडून देतात.

नियमांचा उडतो फज्जा

नाशिकमध्ये वाहनधारक वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत. मग तो चारचाकी वाहनधारक असो की, दुचाकी. सर्रासपणे राँगसाइड प्रवास करणे, दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास, हेल्मेट न घालणे, वेगमर्यादेचे उल्लंघन, सिग्नलचे नियम न पाळणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळेच पुढाकार घेत पोलिस आयुक्तांनी ही हेल्मटसक्ती सुरू केली आहे.

इतर बातम्याः

मालेगावमध्ये चरससारख्या अमली पदार्थाची विक्री; पोलिसांच्या तिघांना बेड्या, एक फरार

चर्चा तर होणारचः शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते संजय राऊत उद्यापासून नाशिक दौऱ्यावर

परमबीर सिंह बेनामी मालमत्ता प्रकरण; पुनमियाच्या जामिनावर गुरुवारी सुनावणी


Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI