AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणातून सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाच्या या 2 खासदारांनी बिघडवला एकनाथ शिंदे यांचा गेम? थेट सहीच..

शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, आता अत्यंत मोठी धक्कादायक बातमी पुढे येत आहे. हा शिंदे गटासाठी मोठा धक्का म्हणावा लागेल. ठाकरे गटाकडून हा दावा करण्यात आला.

राजकारणातून सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाच्या या 2 खासदारांनी बिघडवला एकनाथ शिंदे यांचा गेम? थेट सहीच..
Eknath Shinde
| Updated on: Jun 18, 2026 | 8:17 AM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणत मोठी खळबळ उडाली. शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार शिवसेना शिंदे गटात जात आहेत. त्यांनी तसे पत्र देखील लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजस्थानमध्ये लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. ज्यानंतर दिल्लीत घडामोडी वाढल्या. एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या 6 खासदारांसोबत बैठक घेतली. हे खासदार दिल्लीत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबल्याचे सांगितले जात होते. ठाकरे गटाच्या 2 खासदारांमुळे मोठा गेम होऊ शकतो. मात्र, शिंदे गटाकडून दावा केला जात आहे की, आमचे ऑपरेशन टायगर यशस्वी झाले असून फक्त घोषणाच बाकी आहे. यादरम्यानच आता मोठी अपडेट पुढे येत आहे. शिवसेना शिंदे गटाचा मोठा गेम दोन खासदारांनी केला. ज्यामुळे ते मोठ्या कोडींत अडकले आहेत, असा शिवसेना ठाकरे गटाचा मोठा दावा आहे.

त्यांचे म्हणणे आहे की, बंडखोरी केलेल्या 6 खासदारांपैकी 2 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रावर सही केली नाही. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार संजय दिना पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांना पाठवण्यात आलेल्या पत्रावर सहीच केली नाही. हे दोन्ही खासदार बुधवारी दिल्लीत नव्हते. 6 खासदारांमधील बंडखोरीमध्ये नाव आल्यानंतर संजय पाटील यांनी म्हटले की, मी या गोष्टींला आता थकलो आहे.

मला शिंदे गटाकडून कोणतेही आमंत्रण देण्यात आले नाही. मी त्यांच्याकडे का जाऊ? मी कोणत्याही खासदाराच्या संपर्कात नाही. त्यासोबतच ओमराजे निंबाळकर यांनी देखील 20 जूननंतर जे काही आहे, ते स्पष्ट करू म्हटले आहे. लोकसभा अध्यक्षांना एक पत्र 6 खासदारांकडून स्वतंत्र गट तयार करण्याकरिता देण्यात आले. मात्र, त्यावर ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील यांची सही नसल्याचा दावा करण्यात आला. जर असे घडले असेल तर हा अत्यंत मोठा गेम शिंदे गटाचा म्हणावा लागेल.

या दोन खासदारांमुळे त्यांचे ऑपरेशन टायगर फेल होऊ शकते आणि मोठा गेम होऊ शकतो. मात्र, शिंदे गटाकडून दावा केला जात आहे की, आमचे ऑपरेशन यशस्वी झाले. फक्त घोषणा बाकी आहे. कायदेशीर बाबी तपासून शिंदे गटाकडून दोन दिवसात घोषणा केली जाऊ शकते. हा उद्धव ठाकरे गटाला अत्यंत मोठा धक्का आहे. काल संजय राऊत थेट पत्रकार परिषदेमध्ये शिव्या देतानाही दिसले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी