लोकसभेसाठी ठाकरे गटाचे कोण आहेत ‘स्टार’, प्रचारकांच्या यादीत कोणाचा समावेश?

Lok Sabha Election Maharashtra Politic: सन 2019 मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेना एकत्र होती. त्यावेळी 18 खासदार निवडून आले होते. आता उद्धव ठाकरे यांनी 17 जणांची नावे जाहीर केली आहे. काही ठिकाणी काँग्रेस आणि शरद पवार गटासोबत चर्चा सुरु आहे.

लोकसभेसाठी ठाकरे गटाचे कोण आहेत स्टार, प्रचारकांच्या यादीत कोणाचा समावेश?
उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Mar 30, 2024 | 9:40 AM

शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लोकसभेसाठी 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 16 जणांची नावं असलेली यादी संजय राऊत यांनी ट्विट केली होती. त्याचवेळी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील उमेदवाराची वेगळी घोषणा करण्यात आली होती. शिवसेनेकडून ही रणधुमाळी सुरु झाली असताना शिवसेना स्टार प्रचारकांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. त्यात 40 जणांचा समावेश आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यादीत शिवसेनेचे पदाधिकारी, आमदार, खासदार, शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी यांचा समावेश आहे.

कोणाची नावे यादीत

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ती प्रसिद्धीसाठी देण्यात आली. स्टार प्रचारकांमध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते अनंत गिते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, आमदार अॅड. अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार सुनील प्रभू यांचा समावेश आहे. शिवसेना नेत्यांबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, शिवसेना व युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन बानुगडे-पाटील, लक्ष्मण वडले, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, मनोज जामसुतकर, सुषमा अंधारे, संजय जाधव, किशोरी पेडणेकर, उपनेत्या ज्योती ठाकरे, संजना घाडी, शीतल शेठ-देवरुखकर, जान्हवी सावंत, शरद कोळी, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुनील शिंदे, विलास पोतनीस, वैभव नाईक, नितीन देशमुख, आनंद दुबे, किरण माने, सुभाष वानखेडे आणि प्रियंका जोशी यांचाही या यादीमध्ये समावेश आहे.

शिवसेना उबाठाची जबाबदारी

सन 2019 मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेना एकत्र होती. त्यावेळी 18 खासदार निवडून आले होते. आता उद्धव ठाकरे यांनी 17 जणांची नावे जाहीर केली आहे. काही ठिकाणी काँग्रेस आणि शरद पवार गटासोबत चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाची भूमिका आणि तिकीट मिळालेल्या खासदारांना निवडून आणण्याची जबाबदारी स्टार प्रचारकांवर असणार आहे.