AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरेंच्या आंदोलनात बाचाबाची… पोडियम स्टेज लावण्यावरून कार्यकर्ते पोलिसांशी भिडले

Shivaji Park Protest : मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन केले जात आहे. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चकमक झाल्याचे समोर आले आहे.

ठाकरेंच्या आंदोलनात बाचाबाची...  पोडियम स्टेज लावण्यावरून कार्यकर्ते पोलिसांशी भिडले
Thackeray Group ProtestImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jul 19, 2026 | 5:01 PM
Share

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाच्या नेते आणि कार्यकर्त्यांसह शेकडो नागरीक हजर आहेत. उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाची घोषणा करताना सर्व पक्षाच्या नेत्यांना हजर राहण्याचे आवाहन केले होते. अशातच आता या आंदोलनात शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चकमक झाल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शिवाजी पार्कवरील आंदोलनात पोलिस आणि कार्यकर्यांमध्ये बाचाबाची

मुंबईतील शिवाजी पार्कवरील शिवसेना Shivaji Park Protest : मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन केले जात आहे. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चकमक झाल्याचे समोर आले आहे. यांच्या आंदोलनात पोडियम स्टेज लावण्यावरून कार्यकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची झाली आहे. पोलिसांनी पोडियम स्टेज लावण्यास विरोध करताच कार्यकर्ते भडकले आणि भाजपाच्या दबावामुळे पोलीस विरोध करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांचा मोठा ताफा तैणात

शिवाजी पार्क येथील शिवसेना ठाकरे यांच्या आंदोलनासाठी मीनाताई ठाकरे पुतळा ते शिवसेना भवनापर्यंत प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनाचा स्टेज वाढविण्यावरून कार्यकर्ते पोलिसात झालेल्या बाचाबाची नंतर स्टेज तिथेच राहणार असल्याची माहिती देताना आता वाद मिटला असल्याची माहिती आमदार महेश सावंत यांनी दिली आहे.

तरुणाईचा आंदोलनात सहभाग

या आंदोलनात His Questions not His body अशा आशयाचे बॅनर घेवून तरुणी शिवाजी पार्क येथील आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. कोणत्याही पक्षाला नाही तर सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ या आंदोलनात सहभागी झाल्याचे मुलींनी सांगितले आहे. जे पेपर फुटले त्यासाठी विद्यार्थी किती तयारी करतात आणि असे पेपर फुटले तर विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. शिक्षण व्यवस्थेत सुरू असलेल्या भ्रष्ट कारभाराबाबत तीव्र संताप आहे. मात्र आम्ही आंदोलनात सहभागी झालो तर ट्रोल करतात, कुटुंबाला त्रास ही देतात त्यामुळे अनेक विद्यार्थी सहभागी होत नसल्याची भीती ही तरुणींनी व्यक्त केली आहे

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...