Ambernath Shivsena : शिवसेनेच्या महिला आघाडीने वाचला समस्यांचा पाढा, नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

काही ठिकाणी मोठे नाले तुंबले असून त्याचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. त्यात शहराच्या काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असून त्यामुळं रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Ambernath Shivsena : शिवसेनेच्या महिला आघाडीने वाचला समस्यांचा पाढा, नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
शिवसेनेच्या महिला आघाडीने वाचला समस्यांचा पाढाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 9:31 PM

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील नागरी समस्यांबाबत नगरपालिका (Nagarpalika) प्रशासन उदासीन असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या महिला आघाडी (Womens Lead)ने आज अंबरनाथ नगरपालिकेत धडक दिली. यावेळी अंबरनाथ शहरातील नागरी समस्यां (Civil Problems)चा पाढाच महिला आघाडीने वाचून दाखवला आणि प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरलं. पावसाळा सुरू होताच अंबरनाथ शहरात अनेक समस्यांनी डोकं वर काढलंय. अंबरनाथ शहरात सध्या अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचण्याचे प्रकार गेल्या काही दिवसात घडले असून नागरिकांच्या अक्षरशः घरात पावसाचं पाणी जातंय.

पुढील 15 दिवसात सर्व समस्या मार्गी लावण्याचं आश्वासन

काही ठिकाणी मोठे नाले तुंबले असून त्याचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. त्यात शहराच्या काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असून त्यामुळं रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या सगळ्या विरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शहर संघटक नीता परदेशी यांच्या नेतृत्त्वाखाली महिला आघाडीने अंबरनाथ नगरपालिकेत धडक दिली. यावेळी मुख्याधिकारी नसल्यानं अतिरिक्त मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांच्या दालनात जाऊन महिलांनी समस्यांचा पाढाच वाचून दाखवला. या सगळ्यावर पुढील 15 दिवसात सर्व समस्या मार्गी लावण्याचं आश्वासन अतिरिक्त मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी दिलं.

अंबरनाथमध्ये मुख्य रस्त्यावर झाड कोसळलं

अंबरनाथमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. वेल्फेअर सेंटर ते रोटरी क्लब दरम्यानच्या रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास हे झाड कोसळलं. यामुळे रस्त्याची एक बाजू बंद झाली आहे. हा रस्ता अंबरनाथ एमआयडीसीत जाणारा मुख्य रस्ता असून वडवली परिसरातून स्टेशनला जोडणारा एकमेव रस्ता आहे. त्यामुळं झाड कोसळल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून हे झाड हटवण्याचं काम हाती घेण्यात आलंय. (Shiv Sena womens front in Ambernath accused it of ignoring civic issues)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.