खरातने शिवाजी सहाणे यांनाही सांगितलं होतं भविष्य, पण दोनच दिवसात जे घडलं त्याने बसला मोठा धक्का, आणखी एक कारनामा समोर

एक आठ -दहा वर्षांपूर्वी माझा खरातसोबत परिचय झाला होता. तो नेमका कोणाच्या माध्यमातून झाला होता ते मला आठवत नाही, असंही यावेळी शिवाजी सहाणे यांनी म्हटलं आहे.

खरातने शिवाजी सहाणे यांनाही सांगितलं होतं भविष्य, पण दोनच दिवसात जे घडलं त्याने बसला मोठा धक्का, आणखी एक कारनामा समोर
ashok kharat
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 15, 2026 | 4:00 PM

अशोक खरातचा आणि माझा संपर्क आला होता, अशी प्रतिक्रिया शिवाजी सहाणे यांनी दिली आहे. माझा मित्र हरवला होता, त्यावेळी खरातला फोन केला होता, असं सहाणे यांनी म्हटलं आहे. त्यावेळी खरातने आमचा मित्र सुखरूप असल्याचं सांगितलं होतं. मात्र ते खोटं ठरलं, दुसऱ्या दिवशी मित्राचा मृतदेह सापडला असं सहाणे यांनी म्हटलं आहे. अशोक खरातची भविष्यवाणी खोटी ठरल्याचं सहाणे यांनी म्हटलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरात प्रकरणात शिवाजी सहाणे यांच्या नावाचा उल्लेख केला होता. यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले सहाणे?

अशोक खरातसोबत अनेक लोकांचे संबंध होते, अनेकांनी अशोक खरात याला फोन केला होता, त्यामध्ये शिवाजी सहाणे यांचा देखील समावेश होता असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यानंतर अंजली दमानिया यांच्या या विधानावर आता सहाणे यांनी मोठा खुलासा केला आहे. एक आठ -दहा वर्षांपूर्वी माझा खरातसोबत परिचय झाला होता. तो नेमका कोणाच्या माध्यमातून झाला होता ते मला आठवत नाही, परंतु त्यातील काही ठळक गोष्टी आहेत, ज्यावेळी मी त्याचीशी संर्पक केला. त्यातील दोन दुर्दैवी घटना आहेत. एक चार वर्षांपूर्वी माझा एक मित्र घरातून निघून गेला होता, आणि तो सापडत नसल्यानं आम्ही सर्व मित्रांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. तरी तो सापडेल असं काही वाटेना म्हणून, काही मित्रांनी असं सूचवलं की, अशोक खरातला आपण विचारून बघू त्याला भविष्य कळतं. म्हणून मग मी माझ्याच फोनवरून त्याचीशी संर्पक साधला होता. त्याने मला सांगितलं की आमदार साहेब तुमचा मित्र सुखरूप आहे, आणि तो दोन दिवसांनी परत येईल. पण त्यानंतर दोनच दिवसांनी मला माझ्या मित्राचा मृतदेह गोदावरी नदीत सापडला. तेव्हा आमच्या सर्व मित्रांचा खरातवरून विश्वास उडाला.

पुन्हा एकदा तीन ते चार महिन्यांपूर्वी माझ्या एका मित्राने मला सांगितलं की, त्याच्या मित्राचा मुलगा घरातून निघून गेला आहे. त्यामुळे खरातला विचारायचं आहे? तो नेमका कुठे आहे. तेव्हा मी माझ्या मित्राला म्हटलो की मला नाही वाटत त्याचा फार काही परिणाम होईल, कारण त्याला फार काही भविष्य कळतं असं मला वाटत नाही. तेव्हा मी खरातला फोन केला, पण त्याने माझाही फोन उचलला नाही, पण त्यानंतर 10 मिनिटांनी त्याचाच मला फोन आला.
तेव्हा तो मला म्हणाला आमदार साहेब बोला तेव्हा मी त्याला सर्व किस्सा सांगितला. तेव्हा खरात मला म्हणाला की त्या मित्राशी माझं बोलणं झालं आहे, दोन ते तीन दिवसांमध्ये त्याचा मुलगा घरी येईल, त्यासाठी मी त्याला फोन केल्याच शिवाजी सहाणे यांनी म्हटलं आहे.

 

Follow Us