AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवनेरीवरून मुख्यमंत्र्यांचं भाषण, आंदोलकांकडून ‘ एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा

महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज, शिवनेरीवर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली

शिवनेरीवरून मुख्यमंत्र्यांचं भाषण, आंदोलकांकडून ' एक मराठा लाख मराठा'च्या घोषणा
| Updated on: Feb 19, 2024 | 10:49 AM
Share

जुन्नर- पुणे | 19 फेब्रुवारी 2024 : शिवजयंतीनिमित्त आज राज्यभरात आज उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज, शिवनेरीवर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या हस्ते जन्म सोहळा संपन्न झाला. . शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शिवजयंती सोहळ्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मनोगत व्यक्त केलं. हे राज्य छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणारं राज्य आहे, असं सांगत राज्य सरकार राबवत असलेल्या उपक्रमांबद्दल त्यांनी माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलकांच्या घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं. मात्र त्यांच्या भाषणादरम्यान शिवनेरीवर मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांचं भाषण सुरू असताना मराठा आंदोलकांनी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या .

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन 

शिवनेरीवरून उपस्थितांना संबोधित करताना  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य केल. ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या ( मंगळवार, 20 फेब्रुवारी)  विशेष अधिवेशन बोलावलं आहे. ओबीस तसेच इतर कोणत्याही समाजघटकाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. ‘ उद्याच्या अधिवेशनातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं.

दांडपट्टा राज्यशस्त्र म्हणून घोषित

शासनाने दांडपट्टा या शस्त्राची ‘राज्यशस्त्र ‘ म्हणून घोषणा केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तसेच महाराष्ट्राचे मंत्री सुधीर मुनगंटीवार वाघ नख भारतात आणणार असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. शिवरायांना अभिप्रेत असलेलं सुराज्य आपल्याला निर्माण करायचं आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा