AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मातोश्रीवर रोज बंगाली बाबाचा वावर, हल्ली उद्धव ठाकरे… शिंदे गटातील नेत्याची टीका

शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या अघोरी पूजेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाने यावर टीका केली असताना, शिंदे गटाने मातोश्रीवरील बंगाली बाबा कनेक्शनचा मुद्दा उपस्थित केला आहे.

मातोश्रीवर रोज बंगाली बाबाचा वावर, हल्ली उद्धव ठाकरे... शिंदे गटातील नेत्याची टीका
उद्धव ठाकरेImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jun 19, 2025 | 2:43 PM
Share

राज्याच्या मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचा अघोरी पूजा करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन सध्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आता यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आघोरी विद्येमध्ये रममाण असलेले मंत्री महाराष्ट्राचा काय भलं करणार आहेत? असा सवाल संजय राऊतांनी विचारला. त्यावर आता शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.

संजय शिरसाट यांनी नुकतंच टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊतांसह शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंवर टीका केली. संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं, असा सवाल संजय शिरसाट यांनी केला आहे.

मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते शोधा

“भरत शेट गोगावले हे पूजा पाठ करणारे आहेत हे महाराष्ट्राला कळालं. अघोरी पूजा अशी कॅमेऱ्यावर होत नाही. ती बंद खोलीत, जंगलात होते. हे मदारीचे खेळ बंद करावेत.. जे टीका करतात त्या संजय राऊतला कळायला पाहिजे. मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण संजय राऊतांनी सांगावं. त्याची पण मीडियाने माहिती घ्यावी, कारण मातोश्रीवर रोज एका बंगाली बाबाचा वावर असतो. तो यांना सांगतो आज काय करायचं, काय नाही. आजकाल उद्धव ठाकरे त्यांचं जास्त ऐकतात. मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते शोधा”, असे संजय शिरसाट म्हणाले.

“आम्ही बाळासाहेबांचं ज्वलंत हिंदुत्व घेऊन पुढे जात आहोत. उद्धव साहेबांनी शिवसेनेची काँग्रेस केली आहे. त्यांना बाळासाहेबांच्या वक्तव्याचा विसर पडला आहे. एकनाथ शिंदे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जात आहेत. त्यांच्या पक्षात प्रवेशासाठी रांगा लागल्या असून, प्रवेशासाठी तारखा ठरवाव्या लागत आहेत”, असे संजय शिरसट यांनी म्हटले.

भविष्यात काहीतरी सकारात्मक घडेल

राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीबाबत उद्धव ठाकरे सध्या काहीही बोलणार नाहीत, कारण त्यासाठी आवश्यक असलेला संवाद दोघांमध्ये नाही, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले. हिंदुत्व ही आपली विचारधारा असून, शिंदे साहेब यापूर्वीच राज ठाकरे यांना भेटले आहेत. भविष्यात काहीतरी सकारात्मक घडेल अशी आम्हाला आशा आहे, असेही ते म्हणाले.

काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.