Sanjay Raut : संजय राऊत धमकी प्रकरणात धक्कादायक खुलासा, मनसेची पहिली जळजळीत प्रतिक्रिया, VIDEO

Sanjay Raut threat Case : संजय राऊतांनी राजकारण सोडून नाटकात काम केलं, तर ते चांगलं नाव कमावतील" असं संदीप देशपांडे म्हणाले. संजय राऊत यांनी आता न घाबरता, न थुंकता सकाळी यावर उत्तर द्यावं, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली.

Sanjay Raut : संजय राऊत धमकी प्रकरणात धक्कादायक खुलासा, मनसेची पहिली जळजळीत प्रतिक्रिया, VIDEO
sanjay raut threat case
| Updated on: Jun 15, 2023 | 1:12 PM

-निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी

मुंबई : संजय राऊत धमकी प्रकरणात मयूर शिंदे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा मयूर शिंदे संजय राऊत यांचे बंधु सुनील राऊत यांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. दोघांचे फोटो समोर आले आहेत. या विषयावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. “संजय राऊत हा एक नंबरचा बोगस माणूस आहे, हे सर्व या प्रकरणात सिद्ध झालय” असं संदीप देशपांडे म्हणाले.

“किती खोट बोलायच? किती खोटरडे आहेत? सुरक्षा मिळावी, तामझाम वाढावा, यासाठी किती नाटक करावी, याचं संजय राऊत मूर्तिमंत उदाहरण आहेत” अशी बोचरी टीका संदीप देशपांडे यांनी केली.

‘राऊतांनी राजकारण सोडून नाटकात काम करावं’

“तुम्ही तुमच्या माणसाला सांगता धमकीचे फोन कर. तो फोन करुन शिव्या घालायच नाटक करतो, सुनील राऊत त्याला शिव्या घालून उत्तर देण्याचं नाटक करतात. संजय राऊतांनी राजकारण सोडून नाटकात काम केलं, तर ते चांगलं नाव कमावतील” असं संदीप देशपांडे म्हणाले.

निलेश पराडकर कोण?

“रोज सकाळी ते ज्या पद्धतीने पत्रकार परिषदा घेऊन हंगामा करतात, त्यांचे गँगस्टर्सशी संबंध असल्याच सिद्ध झालय. माझ्यावर जो हल्ला झाला, त्यात निलेश पराडकर नावाचा एक आरोपी असल्याची माहिती आहे. हा पराडकर गायब आहे. निलेश पराडकर संजय आणि सुनील राऊत यांच्या जवळचा माणूस आहे “असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला.

‘संजय राऊत यांनी न घाबरता, न थुंकता उत्तर द्याव’

“लोकांना मारण्याची कामं संजय राऊत करतात हे सिद्ध झालय. लोकांनी त्यांच्या पार्श्वभागावर लाथ मारुन त्यांना हाकलून दिलं पाहिजे. मयूर शिंदे शिवेसेनेचा कार्यकर्ता, गँगस्टर सुद्धा आहे. संजय आणि सुनील राऊत यांच्यासोबत त्याचे अनेक फोटो आहेत. संजय राऊत यांनी न घाबरता, न थुंकता सकाळी यावर उत्तर द्यावं. त्यांचा सर्व बनाव उघड झालाय” असा आरोप संदीप देशपांडे यांनी केलाय