औरंगाबादेत नव्या छाव्यांना संधी, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेची जुळवाजुळव

| Updated on: Jan 28, 2021 | 4:05 PM

औरंगाबाद महापालिका निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच शिवसेनेने राजकीय गणितं आखण्यास सुरुवात केली आहे. (Shivsena Subhash Desai Aurangabad)

औरंगाबादेत नव्या छाव्यांना संधी, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेची जुळवाजुळव
सुभाष देसाई (औद्योगिकमंत्री, शिवसेना नेते)
Follow us on

औरंगाबाद : आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीत (Aurangabad Municipal Election) शिवसेना नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. शिवसेनेचे दिग्गज नेते आणि औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्यासोबत झालेल्या गुप्त बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे. शिवसेनेने महापालिकानिवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. (Shivsena Leader Subhash Desai plans for Aurangabad Municipal Election)

मार्च महिन्यात औरंगाबाद महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच शिवसेनेने राजकीय गणितं आखण्यास सुरुवात केली आहे. जुन्या नेत्यांना तिकीट देण्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर शिवसेनेचा भर असेल. आता हे नवे चेहरे इतर पक्षातून आलेले आयाराम असणार, की पक्षातील युवा नेतृत्वाला तिकीट मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा पेटला

औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची शिवसेनेची जुनीच मागणी आहे. सध्या शिवसेना सत्तेत आहे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे या मागणीला आता अधिक जोर चढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेसचा औरंगाबादच्या नामांतराला स्पष्ट विरोध आहे. त्यातच औरंगाबाद शहरात सध्या बॅनरवॉर सुरु असल्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा अधिक पेटण्याची शक्यता आहे.

औरंगाबादचं महापौरपद शिवसेनेकडे

भाजप-शिवसेना युतीची सत्ता गेली 30 वर्ष औरंगाबाद महापालिकेवर आहे. मात्र राज्यातील युती तुटल्यापासून औरंगाबाद महापालिकेतही याचे पडसाद जाणवू लागले. भाजपच्या विजय औताडे यांनी डिसेंबर 2019 मध्ये उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. मात्र महाविकास आघाडीमुळे औरंगाबाद महापालिकेत उपमहापौरपद खेचून आणण्यात शिवसेनेला यश आलं. औरंगाबादच्या उपमहापौरपदी शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांची निवड झाली.

औरंगाबाद महापालिका पक्षीय बलाबल

शिवसेना – 29
भाजप – 22
एमआयएम – 25
कॉंग्रेस – 10
राष्ट्रवादी – 03
बसप – 05
रिपब्लिकन पक्ष – 01
अपक्ष – 18

(संदर्भ : विकीपीडिया)

संबंधित बातम्या :

इजा बिजा तिजा! औरंगाबाद महापालिका निवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता

38 वर्षांनी शिवसेनेची साथ सोडणार, चंद्रकांत खैरेंचा विश्वासू सहकारी मनसेत

(Shivsena Leader Subhash Desai plans for Aurangabad Municipal Election)