38 वर्षांनी शिवसेनेची साथ सोडणार, चंद्रकांत खैरेंचा विश्वासू सहकारी मनसेत

औरंगाबादमधील शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख सुहास दशरथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार आहेत.

38 वर्षांनी शिवसेनेची साथ सोडणार, चंद्रकांत खैरेंचा विश्वासू सहकारी मनसेत
Follow us
| Updated on: Feb 08, 2020 | 9:24 AM

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू शिवसैनिक मनसेत प्रवेश (Aurangabad Shivsena Official in MNS) करणार आहे.

शिवसेनेचे पदाधिकारी सुहास दशरथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज सकाळी अकरा वाजता ‘कृष्णकुंज’वर पक्षप्रवेश होणार आहे.

सुहास दशरथे हे शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख म्हणून कार्यरत होते. गेल्या 38 वर्षांपासून दशरथे हे शिवसेनेत कार्यरत होते. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे ते अत्यंत विश्वासू मानले जातात.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने नऊपैकी सहा जागांवर विजय मिळवला. मात्र महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दशरथे मनसेत प्रवेश घेत असल्यामुळे शिवसेना झटका बसण्याची शक्यता आहे. एप्रिल 2020 मध्ये औरंगाबाद पालिकेची निवडणूक होणार आहे.

औरंगाबाद महापालिका पक्षीय बलाबल

शिवसेना – 29 भाजप – 22 एमआयएम – 25 कॉंग्रेस – 10 राष्ट्रवादी – 03 बसप – 05 रिपब्लिकन पक्ष – 01 अपक्ष – 18

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मनसेच्या महाअधिवेशनापूर्वी ट्विटरवरुन थेट शिवसैनिकांनाच मनसेत सहभागाचं आवताण दिलं होतं. महाअधिवेशनानंतर मनसेची ताकद वाढताना दिसत आहे.

हेही वाचा : शिवसेनेतील नाराज आमदारांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘ॲक्शन प्लॅन’

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला होता. जोगेश्वरीतील प्रसिद्ध ‘जय जवान दहिहंडी पथका’तील कार्यकर्त्यांनीही मनसेत प्रवेश केला होता.

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्या (रविवार 9 फेब्रुवारी) दुपारी बारा वाजता मोर्चा काढणार आहे. गिरगाव चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

Aurangabad Shivsena Official in MNS

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.