‘हे भिवंडी आहे, इथे मराठीची काय गरज?’ अबू आझमींच्या वक्तव्यावर शिंदेंच्या आमदाराच उत्तर

"संजय राऊत यांना मला सांगायचंय की दिल्लीची बूट चाटूगिरी कुणी केली? सोनिया गांधींना कोण जाऊन भेटलं होतं, कुणी बाळासाहेबांचे विचार सोडले. एकनाथ शिंदे ही खरी शिवसेना पुढे नेत आहेत, ज्यात बाळासाहेबांचे विचार आहेत" असं प्रकाश सुर्वे म्हणाले.

हे भिवंडी आहे, इथे मराठीची काय गरज? अबू आझमींच्या वक्तव्यावर शिंदेंच्या आमदाराच उत्तर
abu azmi
| Updated on: Oct 01, 2025 | 3:55 PM

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मराठी भाषेवरुन एक वादग्रस्त विधान केलं. ‘हे भिवंडी आहे, इथे मराठीची काय गरज?’ या अबू आझमी यांच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झालाय. त्यावर शिवसेना एकनाथ शिंदे यांचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी उत्तर दिलय. “महाराष्ट्रात मराठीचा सन्मान झालाच पाहीजे. अबू आझमी यांना जर मराठी शिकायची असेल तर त्यांना बाराखडीचं पुस्तक मी देतो, त्यांनी शिकावी. आधी आम्ही त्यांना समजावून सांगू, नाही समजले तर मग आमच्या भाषेत समजावून सांगू” असं प्रकाश सुर्वे म्हणाले. “संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय त्यांनी मला सांगावं की त्यांना कुठे उपचार करायचा आहे. मी स्वत: सगळा खर्च करतो. उपचार करून देतो” असं प्रकाश सुर्वे म्हणाले.

“संजय राऊत यांना मला सांगायचंय की दिल्लीची बूट चाटूगिरी कुणी केली? सोनिया गांधींना कोण जाऊन भेटलं होतं, कुणी बाळासाहेबांचे विचार सोडले. एकनाथ शिंदे ही खरी शिवसेना पुढे नेत आहेत, ज्यात बाळासाहेबांचे विचार आहेत” असं प्रकाश सुर्वे म्हणाले.

पैशांचा धूर हा तिथे निघेल

“संजय राऊतांनी बाळासाहेबांच्या विचारांना कधीच सोडलंय. मनपात भ्रष्टाचार केला, पत्राचाळीत घेटाळा केला. ⁠त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवू नये. पैशांचा धूर हा तिथे निघेल, इथे बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं लूटलं जाईल” अशा शब्दात प्रकाश सुर्वे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यावर निशाणा साधला.

अबू आझमी काय म्हणाले?

अबू आझमी म्हणाले की, “मी फक्त एकटा मुलाखत देत नव्हतो तर एकावेळी 10 ते 12 पत्रकार उभे होते. जर एक व्यक्ती बोलत असता तर मी त्याला मराठीत बोललो असतो. सर्वजण बोलत होते आणि माझ्याकडे इतका जास्त वेळ नव्हता की, मी सर्वांना बोलू शकेल. मी फक्त इतके म्हणालो की, मराठी ही फक्त महाराष्ट्रापर्यंत जाईल मी जर हिंदीत बोललो तर माझे म्हणणे पूर्ण देशापर्यंत पोहोचेल”