AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटात गेल्याचा पश्चात्ताप, रात्रभर झोप लागली नाही; ठाकरे गटात आलेल्या महिला शिवसैनिकाने मांडली व्यथा

सुजाता शिंगडे यांनी शिवसेना शिंदे गट सोडून उद्धव ठाकरे यांच्या गटात परत प्रवेश केला आहे. शिंदे गटावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी चार महिन्यांपासून झोप नसल्याचे सांगितले आणि शिंदे गटातील अंधाधुंदी कारभार आणि पैशाच्या व्यवहाराचा आरोप केला आहे. त्यांनी शिंदे गटात गेलेल्या इतर कार्यकर्त्यांनाही परत येण्याचे आवाहन केले आहे.

शिंदे गटात गेल्याचा पश्चात्ताप, रात्रभर झोप लागली नाही; ठाकरे गटात आलेल्या महिला शिवसैनिकाने मांडली व्यथा
uddhav thackeray
| Updated on: Jun 06, 2025 | 3:38 PM
Share

एकीकडे मनसे- शिवसेना ठाकरे गट युतीच्या चर्चा सुरु असताना दुसरीकडे ठाकरे गटात आज अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. अंधेरी पूर्वमधील मनसेचे पदाधिकारी वैभव दळवी यांनी अनेक कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर जात शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यासोबतच ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगाडे यांनीही ठाकरे गटात घरवापसी केली. शिवसेना शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगाडे यांनी पुन्हा एकदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी सुजाता शिंगाडे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली.

सुजाता शिंगाडे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर शिंदे गटावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी हात जोडत व्यथा मांडली. मला चार महिने झोप लागली नाही. केवळ तिकडे देखावा आहे. मला जी जबाबदारी द्याल ती पार पाडेन, असे सुजाता शिंगाडे म्हणाल्या.

तिकडे केवळ देखावा

“शिंदे गटात जाणं ही माझी मोठी चूक होती. खरी शिवसेना मातोश्रीतच आहे. मला कोणतंही अमिष नाही. म्हणून मी त्यांची मिंधी नाही. चार पाच महिने मी त्यांच्या पक्षात होते. मला अनेक महत्त्वाची पदं मातोश्रीने दिले. मी ३५ वर्ष मी संघटनेचं काम केलं आहे. शिंदे गटात कोणत्या अमिषाला बळी पडून लोक जातात हे सांगता येत नाही. मला चार महिने झोप लागली नाही. केवळ तिकडे देखावा आहे. कधी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना कधी भेटू असं झालं होतं”, असे सुजाता शिंगाडेंनी म्हटले.

अंधाधुंदी कारभार सुरू

“ज्या लोकांना पैसे घेऊन घेतलं. ते लोकही पश्चात्ताप होत आहे. मला शिंदे गटाने काही बैठका घ्यायला लावल्या होत्या. मी बैठका घेतल्या. पण तिथे कुणाचा कुणाला ताळमेळ नव्हता. अंधाधुंदी कारभार सुरू आहे. पैसे देऊन लोकांना घेतलं होतं. शिंदे कुणाकडे बघत नाही. मला मधल्या एजंटने फसवलं. मी माहेरी आले. माझ्या घरी आले. बरं वाटतं. मी ३५ वर्ष संघटनेचं प्रामाणिक काम केलं. मला खूप आनंद झाला”, असेही त्या म्हणाल्या.

उद्धव ठाकरेंसारखा माणूस नाही

“माझ्या विभागात हेवेदावे होते. म्हणून मी गेले होते. पण मी आज दिलगीरी व्यक्त करते. मला जाण्यात स्वारस्य नव्हतं. पदातही इंटरेस्ट नव्हता. लोकांनी जाऊ नये ही विनंती करते. जे गेले त्यांनी परत यावं. हे आपलं घर आहे. वहिनी माझ्यासोबत बोलल्या. बरं वाटलं. माँसाहेबांची जागा वहिनी चालवत आहे. उद्धव ठाकरेंसारखा माणूस नाही. नगरसेवक निघून जात आहेत. तरीही साहेब ठाम आहे. धनुष्य बाण मिळो ना मिळो आपली शिवसेना आपण मोठी करू. मला जी जबाबदारी द्याल ती पार पाडेल”, असेही सुजाता शिंगाडे म्हणाल्या.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!