AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाचे सर्वच नेते राज्यपालांना भेटणार, अचानक निर्णय, काय घडतंय?

शिवसेना (ठाकरे गट) नेते आज राज्यपालांची भेट घेऊन महायुती सरकारातील वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत. मंत्र्यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे, असा आरोप केला जात आहे.

सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाचे सर्वच नेते राज्यपालांना भेटणार, अचानक निर्णय, काय घडतंय?
uddhav thackeray c p radhakrishnan
| Updated on: Jul 28, 2025 | 10:42 AM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून एक मोठी मागणी केली जाणार आहे. यामुळे महायुती सरकारला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही नेते आज सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान राजभवनात  जाणार आहेत. यावेळी ते राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून महायुतीतील कलंकित मंत्र्‍यांचे राजीनामे घेण्याची मागणी केली जाणार आहे.

गेल्या काही दिवसात सत्ताधारी मंत्र्यांचे जे अत्यंत बेजबाबदार वर्तन सुरू आहे . यामुळे विधिमंडळाच्या पावित्र्याला धक्का लागत आहे. तसेच जनमानसातील विधिमंडळ कामकाजासंदर्भातल्या विश्वासाला सुद्धा धक्का लागत आहे. सबब अशा बेजबाबदार मंत्र्यांना तातडीने सत्तेतून पायउतार करावे. यासाठी आज सकाळी 11:20 वाजता शिवसेना UBT चे सर्व नेते, लोकप्रतिनिधी महामहीम राज्यपाल महोदयांची राजभवन येथे भेट घेऊन अशा वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामा घेण्याबाबत निवेदन देत आहोत, अशी माहिती ठाकरे गटाने दिली आहे.

सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

नुकतंच याबद्दल शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राज्यपालांची भेट घेण्यासाठी जात आहेत. सध्याच्या मंत्र्यांच्या वागणुकीमुळे लोकशाहीला धक्का लागत आहे आणि त्यांचे वर्तन अत्यंत बेजबाबदारपणे सुरू आहे. या मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठीच आज राज्यपाल भेटीला जात असल्याचे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले.

यावेळी सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर भाष्य केले. “आमच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा दिवस होता. दुधात साखर पडावी त्याप्रमाणे हे घडले आहे. दोन भावांनी एकत्र येणे महत्त्वाचे होते. तसेच दोन मने जुळणे हे देखील महत्त्वाचे आहे. जेव्हा कुटुंब एकत्र येते, तेव्हा असे घडते. देवेंद्र फडणवीस यांचे नाव यापूर्वीच खराब झाले आहे. त्यांनी या भेटीवर सावध प्रतिक्रिया दिली, हेच त्यांचा अलर्टपणा दर्शवते”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

कोणत्या गटातील किती मंत्री?

दरम्यान शिंदे गटाच्या तीन ते चार मंत्र्यांना संभाव्य फेरबदलात नारळ दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये वादग्रस्त ठरलेले सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, मंत्री भरत गोगावले, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा समावेश असल्याचे बोललं जात आहे. तर अजित पवार गटातील धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख प्रकरणामुळे आधीच राजीनामा झाला आहे. त्यापाठोपाठ आता सातत्याने वादग्रस्त ठरणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याची चर्चा आहे. तसेच, नरहरी झिरवळ यांनाही मंत्रिपद गमवावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मत्स्यविकास मंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त वर्तन केले जात आहे. त्यामुळे त्यांचेही मंत्रिपद धोक्यात आले आहे.

गिरीश महाजन यांनाही पक्षाच्या गरजेनुसार मंत्रिमंडळाबाहेर राहण्यास सांगितले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. या फेरबदलात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी भाजपमध्ये सध्या नाराज असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र या संभाव्य फेरबदलांमुळे राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता