Sanjay Raut : माझ्या घरी या, परत कसे जाता बघतो – संजय राऊतांचं कोणाला आव्हान ?

संजय राऊतांनी सांभाळून बोलावं नाहीतर घरात घुसून मारू असा इशारा आमदार राजेश मोरे यांनी दिला होता. राऊत यांनी आनंद दिघेंबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आक्रमक झालेल्या राजेश मोरेंनी खालच्या शब्दांत टीका केली होती.

Sanjay Raut : माझ्या घरी या, परत कसे जाता बघतो - संजय राऊतांचं कोणाला आव्हान  ?
संजय राऊत
| Updated on: Sep 20, 2025 | 10:53 AM

संजय राऊतांनी सांभाळून बोलावं नाहीतर घरात घुसून मारू असा इशारा आमदार राजेश मोरे यांनी दिला होता. राऊत यांनी आनंद दिघेंबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आक्रमक झालेल्या राजेश मोरेंनी खालच्या शब्दांत टीका केली होती. त्यावर आता संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. हे जे कोणा बोलत आहेत, त्यांना आनंद दिघे समजले नाही, त्यांना ते माहीत नाहीत.

हे बोलतातच, त्यांचे नेते एकनाथ शिंदे, त्यांनी एक सिनेमा काढला म्हणून त्यांना आनंद दिघे समजलेत असं नाही. सिनेमातल्या 90 टक्के गोष्टी खोट्या आणि भंपक आहेत. आणि गद्दार जर आमच्यावर चाल करून येऊ लागले तर कठीण आहे. इतक्या वर्षांत अशा गद्दारांच्या वल्गना आम्ही खूप पाहिल्या आहेत.कोण राजेश मोरे, येऊ दे त्यांना, काही हरकत नाही असं म्हणत राऊतांनी थेट आव्हान दिलं.

दरम्यान राजेश मोरे यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे सेनेच्या पदाधिकारी आक्रमक झाल्या असून मोरेंविरोधात घोषणा देण्यात येत आहेत.

राजन विचारे नसते तर एकनाथ शिंदे दिसलेच नसते

राजन विचारे नावच्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी शएंदूर फासला म्हणून ते पुढे आले, असे वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी नुकतेच केले. संजय राऊत यांनी त्यांनाही सुनावलंय.  प्रताप सरनाईक नावाच्या धोंड्याला कोणी शेंदूर फासला, उद्धव ठाकरे यांनीच फासला ना. प्रताप सरनाईक, एकनाथ  शिंदे वगैरे लोकांचं कर्तृत्व काय आहे? मराठी माणूस, महाराष्ट्रासाठी काय त्यांनी शौर्य दाखवलं ? असा सवाल विचारत, त्यांनी या विषायवर बोलू नये असं राऊतांनी सुनावलं.

प्रताप सरनाईक यांच्याआधीपासून राजन विचारे हे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. सरनाईक हे अनेक पक्ष फिरून , शिवसेनेमध्ये आमदार होण्यासाठी आले. आणि मंत्री होण्यासाठी त्यांनी बेईमानी केली.  त्यांच्या घरावर ईडीच्या धाडी पडल्यावर ते पळून गेले, त्यांनी  राजन विचारे किंवा आमच्या इतर शिवसैनिकांबद्दल न बोललेलंच बरं असंही राऊतांनी सुनावलं.  राजन विचारे यांनी त्याग केला नसता, तर एकनाथ शिंदे दिसलेच नसते, याचा पुनरुच्चार संजय राऊतांनी केला.