‘झंडू बाम, झंडू बाम, रामदास कदम झालाय जाम’! ठाकरे गटाच्या नेत्याची खोचक टीका

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी धक्कादायक विधान केले होते. अशातच आता ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी कदम यांना टोला लगावला आहे.

झंडू बाम, झंडू बाम, रामदास कदम झालाय जाम! ठाकरे गटाच्या नेत्याची खोचक टीका
Ramdas-Kadam
| Updated on: Oct 05, 2025 | 6:59 PM

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी धक्कादायक विधान केले होते. ‘शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले? आणि त्यांचा मृतदेह मातोश्रीवर किती दिवस ठेवण्यात आला होता, याची चौकशी व्हावी’ असं कदम यांनी म्हटलं होतं. यावर ठाकरे गटाचे नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी कदम यांना टोला लगावला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

‘झंडू बाम, झंडू बाम, रामदास कदम झालाय जाम’

शरद कोळी यांनी रामदास कदम यांच्यावर टीका करताना म्हटले की, ‘झंडू बाम, झंडू बाम, रामदास कदम झालाय जाम. रामदास कदम तुम्ही 8 दिवस मातोश्रीबाहेर मुक्कामी होता, त्यावेळी झाडून काढत होता आणि झेंडू बाम शोधत होता. रामदास कदम खाल्लेल्या मिठाला जागा, भाजपचे सालगडी म्हणून तुमचा वापर होतोय.’

उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर तुम्ही मोठे झालात

पुढे बोलताना शरद कोळी म्हणाले की, ‘तुमच्या बायकोने सांगितले, आम्ही स्टोव्हवर स्वयंपाक करत होतो मग तुमची हजार कोटीची प्रॉपर्टी घाम गाळून कमवली का? उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर तुम्ही मोठे झालात त्यांच्याबाबत तुम्ही अपशव्द वापरताय. रामदास कदम तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही, किती खालच्या थराचे राजकारण कराल?’.

आता डान्सबार ऐवजी तमाशा काढा

डान्सबारवरून टीका करताना शरद कोळी म्हणाले की, ‘शहाजहानने बायकोसाठी ताजमहाल बांधला पण रामदास कदम तुम्ही बायकोसाठी डान्सबार बांधला. उद्धव ठाकरेंचे पाय चाटून तुम्ही एवढे मोठे झालात हे विसरू नका. रामदास कदम महाराष्ट्रातील जनता सोडा, तुमच्या पोरांची पोरं तुम्हाला धक्के देऊन बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही आता तमाशातील नाच्याचे काम करा, आता डान्सबार ऐवजी तमाशा काढा.’ दरम्यान, आता शरद कोळी यांच्या या टीकेला रामदास कदम किंवा शिवसेनेचे नेते काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.