उठ दुपारी, घे सुपारी नंतर सुषमा अंधारे यांची राज ठाकरेंवर आणखी एक खोचक टीका; म्हणाल्या, राज हे…

"मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंचा मला अभिनंदनाचा फोन आला होता, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं , मी घरी येईन. त्यामुळेच आज मी त्यांच्या घरी गेलो होतो", अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आता यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली.

उठ दुपारी, घे सुपारी नंतर सुषमा अंधारे यांची राज ठाकरेंवर आणखी एक खोचक टीका; म्हणाल्या, राज हे...
sushma andhare raj thackeray
| Updated on: Feb 10, 2025 | 2:20 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांनी जवळपास तासभर बंद दाराआड चर्चा सुरू होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर मनसे-भाजप युती होणार का अशी चर्चा रंगताना दिसली. मात्र या भेटीनंतर ही कुठलीही राजकीय भेट नव्हती. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंचा मला अभिनंदनाचा फोन आला होता, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं , मी घरी येईन. त्यामुळेच आज मी त्यांच्या घरी गेलो होतो, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आता यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली.

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस-राज ठाकरेंच्या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी राज ठाकरेंवर खोचक टीका केली.

“फार काही उलथापालथ होणार नाही”

“राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलेव्हन्स संपत चाललेला आहे. त्यामुळे राज ठाकरे काय बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात फार काही उलथापालथ होणार नाही”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

“राज ठाकरे हे भाजपाच्या विरोधात बोलतात”

“महाराष्ट्राच्या जनतेलाच काय पण मनसेच्या पदाधिकाऱ्यांनादेखील ही गोष्ट यूज टू झालेली आहे. राज ठाकरे हे भाजपाच्या विरोधात बोलतात. मात्र निवडणुका जवळ आल्या की ते प्रो भाजप होतात”, असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला.

“राज ठाकरे यांना कोणीही इतकं सीरियस घेत नाही”

“राज ठाकरे यांना कोणीही इतकं सीरियस घेत नाही. राज ठाकरे हे वैचारिक अधिष्ठान नसणारे आणि सतत भूमिका बदलणारे आहेत. त्यामुळे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले काय किंवा राज ठाकरे त्यांच्याकडे गेले काय हे यू ज टू झालं आहे”, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस- राज ठाकरेंची कशाबद्दल चर्चा?

दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ही भेट कौटुंबिक होती. यात राजकीय कोणत्याही मुद्द्यावर चर्चा झाली नाही, असे त्यांनी सांगितले. तर देवेंद्र फडणवीस यांनी मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंचा मला अभिनंदनाचा फोन आला होता, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं , मी घरी येईन. त्यामुळेच आज मी त्यांच्या घरी गेलो होतो. भेटून गप्पा मारल्या, नाश्ता केला. आणि मग तिथून मी निघालो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.