
राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार आहे. शिवसेना ठाकरे गटात सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. ऑपरेशन टारगरमध्ये ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे अनेक नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा सातत्याने केला जात आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. “शिंदे गट हा भाजपच्या पोटात उगवलेला ॲपेंडिक्स आहे. तो कधीही कापून टाकला जाईल”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना ऑपरेशनर टायरबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यासोबत ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले. आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमचं ॲपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करत आहेत, त्याची तुम्ही काळजी घ्या, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
ऑपरेशन टायर, ऑपरेशन कमळ होईल. पण आधीच ऑपरेशन रेडा झालेलं आहे. अशा अफवा पसरत आहेत. कालच आम्ही आमच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. आमचे सर्व खासदार उपस्थित होते. ते सात आकडा चुकीचा सांगत आहेत. त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा सांगायला हवा. ते कोणत्या गुंगीत आहेत, हे त्यांनी समजून घ्यायला हवं. त्यांनी त्यांची वैद्यकीय चाचणी पूर्ण केली पाहिजे. आता १२.३० वाजता राहुल गांधींची पत्रकार परिषद आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये जे काही घोटाळा झाले, त्याबद्दल पुराव्यानिशी ते बोलणार आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
“ते कसलं ऑपरेशन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रोज त्यांचं ऑपरेशन करतात. त्यांचा रोज अपमान होत आहे. शिंदे गट हा भाजपच्या पोटात उगवलेला ॲपेंडिक्स आहे. तो कधीही कापून टाकला जाईल. पोटात अॅपेंडिक्सची एक गाठ असते. ती कधीही कापली जाऊ शकते. आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमचं ॲपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करत आहेत, त्याची तुम्ही काळजी घ्या”, अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली.
दरम्यान उद्धव ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत. सध्या ठाकरेंचे 9 खासदार लोकसभेत आहेत. त्यापैकी 6 खासदार शिंदे गटात दाखल होऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर ठाकरे गटात मोठी अस्वस्थता आहे. त्यामुळे हे सहा खासदार ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.