शिवशाहीर पुरंदरे यांनी छत्रपतींच्या इतिहासासाठी आयुष्य खर्ची घातलं, पण त्यात काही वादग्रस्त मुद्दे, शरद पवारांची प्रतिक्रिया

शरद पवार म्हणाले, पुरंदरे यांनी शिवछत्रपतींच्या चरित्रासाठी आयुष्य खर्ची घातलं. त्यांच्याबद्दल अशा बदनाम्या केल्या जातात. ते यांच्या बाबतही घडलं असावं.

शिवशाहीर पुरंदरे यांनी छत्रपतींच्या इतिहासासाठी आयुष्य खर्ची घातलं, पण त्यात काही वादग्रस्त मुद्दे, शरद पवारांची प्रतिक्रिया
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 12:04 PM

नाशिकः शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा इतिहास जनतेसमोर ठेवला. मात्र, त्यात काही वादग्रस्त मुद्दे होते. त्यावर भाष्य करण्यास मी जाणकार नाही, अशी प्रतिक्रिया सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ते नाशिकमध्ये बोलत होते.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी निधन झाले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते देशभरातून सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त करून त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. शरद पवार यांनीही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहासाबाबत आस्था निर्माण करण्याचं योगदान दिलं. ते आपण विसरू शकत नाही. त्यांनी शिवरायांच्या चरित्रासाठी आयुष्य खर्ची घातल्याचं वक्तव्य केलं.

अन् वादग्रस्त विषयालाही हात

शरद पवार यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वादग्रस्त विषयालाही बोलताना हात घातला. ते म्हणाले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा इतिहास जनतेसमोर ठेवला. मात्र, त्यात काही वादग्रस्त मुद्दे होते. त्या संदर्भात भाष्य करण्यास मी जाणकार नाही. त्या संदर्भातला मी तज्ज्ञ नाही. त्यांनी एक मोठी कामगिरी केली. शिवछत्रपतींच्या चरित्रासाठी आयुष्य खर्ची घातलं. त्यांच्याबद्दल अशा बदनाम्या केल्या जातात. ते यांच्या बाबतही घडलं असावं. त्यात उणीव काढण्याचा प्रयत्न काही जण करत असतात. ते ही त्यांच्या बाबतीत घडलं.

कामाबाबत वेगवेगळी मतं

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे काम पुढे घेऊन जाण्याचा निर्धार अनेकांनी केला आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्न शरद पवारांना विचारला असता ते म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे यांची बदनामी केली गेली. हे सगळं खरं असलं तरी इतिहासाच्या संदर्भात आस्था निर्माण करण्याचं त्यांचं योगदान आपण विसरू शकत नाही. त्यांचं कार्य पुढे कसं सुरू रहावं, यावर मी भाष्य करणार नाही. यात वेगवेगळी मतं आहेत. मला यात पडायचं नाही.

इतिहासाबाबत आस्था निर्माण केली

शरद पवार पुढे म्हणाले की, पुरंदरे यांनी महाराष्ट्राच्या नव्या पिढीला इतिहास सांगून, जनजागृती केली. त्यांनी शेकडो व्याख्याने घेतली. नव्या पिढीत याबाबत आस्था निर्माण केली, असे बाबासाहेब पुरंदरे आपल्यात नाहीत. ते दीर्घायुषी होते. वयाची शंभरी लोकांशी सुसंवाद ठेवत त्यांनी पार पाडली. शिवरायांचं चरित्र त्यांनी लोकांसमोर ठेवलं असं म्हणत शरद पवारांनी शिवशाहीर पुरंदरेंना श्रद्धांजली वाहिली.

इतर बातम्याः

Babasaheb Purandare Death | शिवशाहीरांच्या निधनावर मोदींचं ट्विट, गडकरी, राऊत, इतर नेते नेमकं काय म्हणाले?

Video: जेव्हा मोदींनी हात जोडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना साष्टांग नमस्कार केला